Ameesha Patel | अमीषा पटेलविरोधात वॉरंट जारी; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

अमीषाच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास ती लवकरच 'गदर 2' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता.

Ameesha Patel | अमीषा पटेलविरोधात वॉरंट जारी; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?
Ameesha PatelImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 8:42 AM

मुंबई : अभिनेत्री अमीषा पटेल गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी ‘गदर 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बऱ्याच वर्षांनंतर ती या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. मात्र यादरम्यान अमीषा तिच्या खासगी आयुष्यामुळेही प्रकाशझोतात आली आहे. यामागचं कारण म्हणजे तिच्याविरोधात जारी करण्यात आलेलं वॉरंट. अमीषा पटेलविरोधात रांचीच्या सिव्हिल कोर्टात वॉरंट जारी करण्यात आलं आहे. हे संपूर्ण प्रकरण चेक बाऊन्स आणि फसवणुकीशी संबंधित आहे.

अमीषाचं हे प्रकरण काही नवीन नाही. याआधीही ती चेक बाऊन्समुळे चर्चेत आली होती. आता रांचीच्या सिव्हिल कोर्टाने अमीषा आणि तिचा बिझनेस पार्टनर कुणालविरोधात चेक बाऊन्स प्रकरणात हे वॉरंट जारी केलं आहे. हे प्रकरण अडीच कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित आहे. 2018 मध्ये तिच्याविरोधात ‘फॅमिली ऑफ ठाकुरगंज’ चित्रपटाचे निर्माते अजय सिंह यांनी खटला दाखल केला होता. अमीषाने म्युझिक व्हिडीओसाठी पैसे घेतले, मात्र तिने कामही केलं नाही आणि पैसेही परत दिले नाही, असा आरोप त्यांनी केला होता.

समन्स बजावल्यानंतरही अमीषा किंवा तिचे वकील हजर झाले नसल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. म्हणूनच आता कोर्टाने तिच्याविरोधात वॉरंट जारी केला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 15 एप्रिल रोजी होणार आहे. याविषयी निर्माते अजय सिंह म्हणाले, “मी अमीषासोबत एक करार केला होता. त्यानुसार ती माझ्या म्युझिक व्हिडीओसाठी काम करणार होती. त्या करारात असं स्पष्ट म्हटलं होतं की तिने जून 2018 पर्यंत व्याजासहीत पैसे परत करावेत. जेव्हा तिच्याकडे मी पैसे मागितले तेव्हा तिने मला अडीच कोटी रुपयांचे चेक दिले. मात्र हे चेक बाऊन्स झाले. आता अमीषा पटेलचा बिझनेस पार्टनर कुणाल गूमर मला धमकावत आहे.”

हे सुद्धा वाचा

अमीषाच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास ती लवकरच ‘गदर 2’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता वीस वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.

गदर 2 मधील ॲक्शन सीन्ससाठी टीनू वर्मा आणि साऊथचे रवी वर्मा यांची मदत घेण्यात आली. यांनी शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटातील ॲक्शन सीन्सवर काम केलं होतं. याशिवाय विकी कौशलचे वडील श्याम कौशल यांचंही चित्रपटाच्या ॲक्शन सीन्समध्ये मोठं योगदान आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.