जेव्हा सलमान खानवर लोकांनी साधला निशाणा, तेव्हा बचावासाठी धावली ऐश्वर्या राय

1998 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र 2002 मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला. इंडस्ट्रीत या दोघांच्या नात्यावर सर्वाधिक चर्चा झाली होती. ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने एका गोष्टीसाठी सलमानची साथ दिली होती.

जेव्हा सलमान खानवर लोकांनी साधला निशाणा, तेव्हा बचावासाठी धावली ऐश्वर्या राय
Salman and AishwaryaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 10:42 AM

मुंबई : 29 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान यांचं नातं हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या विषयांपैकी एक आहे. एकेकाळी हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र नंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले. सलमानच्या आक्रमक वागणुकीमुळे नातं मोडल्याचं ऐश्वर्याने काही मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर त्याने माझ्यावर रागाच्या भरात हातसुद्धा उचलला होता, अशीही कबुली ऐश्वर्याने दिली होती. मात्र जेव्हा सलमान एका कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकला, तेव्हा ऐश्वर्याने त्याला पाठिंबा दिला होता. 2016 मधील ही घटना आहे. त्यावेळी रिओ ऑलिम्पिकसाठी भारताकडून सदिच्छा दूत म्हणून सलमानची नियुक्ती करण्यात आली होती.

सलमानची सदिच्छा दूत म्हणून निवड झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अभिनेत्यापेक्षा क्रीडा क्षेत्रातील एखाद्या नामांकित व्यक्तीला हा सन्मान द्यायला पाहिजे होता, असं मत अनेकांनी मांडलं होतं. इतकंच नव्हे तर गायक मिका सिंग आणि योगेंद्र दत्ता यांनीसुद्धा सलमानची निवड केल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. हा संपूर्ण वाद सुरू असतानाच ऐश्वर्याने सलमानला पाठिंबा दिला होता.

हे सुद्धा वाचा

2016 मधील एका कार्यक्रमात पत्रकाराने सलमान खानच्या या वादावर ऐश्वर्याच्या मताबद्दल विचारलं होतं. त्यावर ऐश्वर्या म्हणाली, “मी यावर असं म्हणेन की जो कोणी या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी चांगलं काम करतोय किंवा कला, संगीत, क्रीडा या क्षेत्रांमध्ये सुधारणांसाठी काम करतोय, बोलतोय किंवा उभा राहतोय, तर त्या व्यक्तीकडे जबाबदारी देण्यात कोणतीच समस्या नसली पाहिजे.” ऐश्वर्याच्या या प्रतिक्रियेची त्यावेळी जोरदार चर्चा झाली होती.

ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमानने 2010 मध्ये त्यावर प्रतिक्रिया दिली होती. “तिने अभिषेकशी लग्न केल्यामुळे मी फार खुश आहे. तो एका चांगल्या कुटुंबातील चांगला मुलगा आहे. ती तिच्या आयुष्यात खुश राहो हीच माझी इच्छा आहे”, असं सलमान म्हणाला होता. इंडस्ट्रीतील जवळपास 35 वर्षांच्या कारकिर्दीत सलमानचं नाव बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय. मात्र 1990 आणि 2000 दरम्यान त्याचं रिलेशनशिप सर्वाधिक चर्चेत होतं. ऐश्वर्या रायसोबतचं त्याचं नातं त्यावेळी जगजाहीर होतं. मात्र ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने सलमानवर काही गंभीर आरोप केले होते. सलमानने मारहाण केल्याचा दावा ऐश्वर्याने केला होता.

2002 मध्ये बॉम्बे टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या सलमानसोबतच्या ब्रेकअपविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. दारुच्या नशेत सलमानने हात उचलल्याचा दावा तिने केला होता. “मी त्याच्या वाईट काळात दारुच्या नशेतील गैरवर्तनाला सहन करत त्याच्या पाठिशी उभी राहिले. त्याबदल्यात मला त्याच्या गैरवर्तणुकीचा (शाब्दिक, शारीरिक आणि भावनिक), अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला. म्हणून इतर कोणत्याही स्वाभिमानी महिलांप्रमाणे मीसुद्धा त्याच्यासोबतचं नातं संपुष्टात आणलं”, असं ऐश्वर्या म्हणाली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.