पोलीस आले दिग्दर्शकाला अटक करायला, गेले दारू पिऊन…, अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला दिग्दर्शक
Famous Filmmaker: जेव्हा दिग्दर्शकाला अटक करण्यासाठी आले होते पोलीस, पण का नाही झाली अटक, दारु पिऊन गेले पोलीस... अनेक वर्षांनंतर प्रकरण समोर... दिग्दर्शक कामय कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत...

Famous Filmmaker: झगमगत्या विश्वातील असे अनेक किस्से आहेत, जे अनेक वर्षांनंतर समोर आले आणि सर्वत्र खळबळ उडाली. आता देखील असंच काही झालं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शकाला पोलीस अटक करण्यासाठी आले होते. पण असं काही झालं की पोलीसच दिग्दर्शकासोबत दारु प्यायला बसले आणि निघून गेले. तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की तो दिग्दर्शक नक्की कोण आहे. सध्या ज्या दिग्दर्शकाची चर्चा रंगली आहे तो दिग्दर्शक दुसरा तिसरा कोणी नाही तर, राम गोपाल वर्मा आहेत.
सांगायचं झालं तर, राम गोपाल वर्मा कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांचे अनेक वादग्रस्त ट्विट देखील त्यांच्या अडचणीचं कारण बनले आहेत. एका मुलाखतीत राम गोपाल वर्मा यांनी एका ट्विट बद्दल सांगितलं ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.
किस्सा सांगत राम गोपाल वर्मा म्हणाले, ‘4 – 5 वर्षांपूर्वी मी काही ट्विट केले होते. पण त्यानंतर त्या ट्विटकडे माझं देखील लक्ष नव्हतं. काही तासांनंतर महेश भट्ट यांचा मला फान आला आणि ते मला म्हणाले रामू तुझ्या ट्विटमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे… ‘
‘तेव्हा भट्ट सरांनी मला सांगितलं होतं, निंदा करणं कायद्याच्या विरोधात नाही. तेव्हा मला काही कळलं नाही. ते कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहेत ते देखील मला माहिती नव्हतं. तेव्हा माझ्या विरोधात 6 – 7 खटले दाखल झाले होते. पण त्या प्रकरणाने वेगळं घेतलं.’
‘आम्ही केसबद्दल विचार करत होतो. पण तेव्हाच माझ्या ऑफिसमध्ये पोलीस आले आणि त्याच दिवशी कायद्यात बदल झाले, ज्यामुळे माझ्यावर तक्रार दाखल झाली होती. अशा परिस्थितीत पोलीस देखील गोंधळले. काय करायचं पोलिसांना देखील कळलं नाही. अखेर पोलीस माझ्यासोबत बसले. आम्ही दारु प्यायलो त्यानंतर पोलीस गेले…’ असं राम गोपाल वर्मा म्हणाले.
दिग्दर्शक पुढे म्हणाले, ‘अनेकदा मी ट्विट काही कारण नसताना करतो. कधी कधी तर मी ट्विट कोणाला चिडवण्यासाठी देखील करतो.’ राम गोपाल वर्मा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.