AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gaur Gopal Das यांचा लव्ह लाईफवर मोठा खुलासा, म्हणाले, ‘चन्ना मेरेया गाणं गाण्याची गरज…’

Gaur Gopal Das | तुम्ही कधी प्रेमात पडलात का? गौर गोपाल दास पाहा काय म्हणाले…; कॉलेजमध्ये असताना गौर गोपाल दास यांना कधी झालं आहे प्रेम... त्यांनीचं केलं मोठं वक्यव्य... गौर गोपाल दास कायम त्यांच्या प्रेरणादायी वक्यव्यातून लोकांना जीवनाचा खरा अर्थ सांगण्याचं काम करत असतात.

Gaur Gopal Das यांचा लव्ह लाईफवर मोठा खुलासा, म्हणाले, 'चन्ना मेरेया गाणं गाण्याची गरज...'
| Updated on: Oct 21, 2023 | 11:48 AM
Share

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : गौर गोपाल दास यांचे अनेक प्रेरणादायी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौर गोपाल दास कायम त्यांच्या प्रेरणादायी वक्यव्यातून लोकांना जीवनाचा खरा अर्थ सांगण्याचं काम करत असतात. फक्त भारतात नाही तर, परदेशात जावून देखील गौर गोपाल दास लोकांना आयुष्याची योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. काही दिवसांपूर्वी गौर गोपाल दास विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचले होते. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये गौर गोपाल दास यांनी कपिल आणि प्रेक्षकांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. शोमध्ये कपिल याने गौर गोपाल दास यांना त्यांच्या लव्हलाईफबद्दल विचारलं…

कपिल शर्मा याने गौर गोपाल दास यांच्या गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंड यांसारख्या व्हिडीओचा उल्लेख करत, गौर गोपाल दास यांच्या खासगी आयु्ष्याच्या अनुभवाबद्दल विचारलं… यावर गौर गोपाल दास म्हणाले, ‘ इंजिनियरींगमध्ये माझं शिक्षण झालं आहे. अभ्यासात मी पूर्णपणे व्यस्त असायचो. रोमान्स करण्यासाठी माझ्याकडे वेळच नव्हता…’

पुढे गौर गोपाल दास म्हणाले, ‘आता लोकं प्रेमात फसवणूक किंवा ब्रेकअप झाल्यानंतर मझ्याकडे येतात. ऐ दिल है मुश्किल म्हणणारे लोकं येतात, नशीब मला चन्ना मेरेया गाणं गाण्याची गरज भासत नाही…’ एवढंच नाही तर गौर गोपाल दास म्हणाले, ‘प्रत्येकाला स्वतःला जे आवडतं ते काम करायला हवं. कारण आपण आपल्या आयुष्यातील जास्त वेळ प्रोफेशनल आयुष्याला देत असतो…’ गौर गोपाल दास कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात.

कोण आहेत गौर गोपाल दास?

गौर गोपाल दास हे एक जीवन मार्गदर्शक आहेत. त्यांनी संन्यास घेतला असून ते आता लोकांना जीवनाचा खरा अर्थ सांगण्याचं काम करत आहेत. ते इस्कॉनचे कार्यकर्ते देखील आहेत. गौर गोपाल दास यांचा जन्म 1973 मध्ये महाराष्ट्रातच झाला. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण पुणे येथे झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातून इलेक्ट्रिकल इंजिनियरींग केली. गौर गोपाल दास यांचे गुरु रामनाथ स्वामी आहेत. त्यांना आधीपासूनच सामाजिक कार्यात खूप रस होता.

गौर गोपाल दास हे उत्तम लेखक, वक्ता आहेत. ते कायम साध्या भाषेमध्ये तरुणांसोबत संवाद साधत त्यांना अध्यात्म समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. एवढंच नाही तर, गौर गोपाल दास त्यांच्या विनोदबुद्धीने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणतात. एवढंच नाही तर, ‘तुमच्याकडे जे असेल त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा…’ असं देखील गौर गोपाल दास अनेकांना सांगतात.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.