‘माझ्या आयुष्यात ते सर्वकाही नव्हतंच…’, अरबाज खान सोबत घटस्फोटानंतर मलायका अरोराने सांगितलेलं मोठं सत्य

Arbaaz Khan : 'माझ्या आयुष्यात ते सर्वकाही नव्हतंच...', लग्नाच्या 18 वर्षांनंतर मलायका - अरबाज यांनी संपवलं होतं नातं, घटस्फोटानंतर मलायका हिने सांगितलं होतं मोठं सत्य... अभिनेत्याने थाटला दुसरा संसार...

'माझ्या आयुष्यात ते सर्वकाही नव्हतंच...', अरबाज खान सोबत घटस्फोटानंतर मलायका अरोराने सांगितलेलं मोठं सत्य
Follow us
| Updated on: Dec 25, 2023 | 10:32 AM

मुंबई | 25 डिसेंबर 2023 : एक काळ असा होता जेव्हा अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा चाहत्यांना कपल गोल्स देत होतं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका – अरबाज यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांचं नातं फक्त 18 वर्ष टिकलं. घटस्फोटाच्या 6 वर्षांनंतर अरबाज खान याने 41 वर्षीय शूरा खान हिच्यासोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अरबाज – शूरा यांचे फोटो देखील सोशल मीडियावर चर्चेत आहे. लग्न अरबाज याने केलं, पण मलायका देखील चर्चेत आली आहे. दरम्यान एक मुलाखतीत अभिनेत्रीने घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा केला होता.

मलायका अरोरा हिच्या यशामागे खान या नावंचं मोठं श्रेय आहे का? असा प्रश्न मलायका हिला विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘नावाचा फायदा मला नक्की झाला, पण याच फॅक्टसोबत मी राहू शकत नव्हती की माझ्या नावापुढे एक प्रसिद्ध आडनाव आहे…’

‘मला नव्हतं वाटत की माझ्या आयुष्यात तेच सर्वकाही आहे, जे मला करायचं होतं. खान नावामुळे माझ्यासाठी अनेक दरवाजे खुले झाले होते. पण अखेर मला वाटू लागलं की मला खान या नावा शिवाय काम करायचं आहे आणि इंडस्ट्रीमध्ये कायम राहण्यासाठी अधिक मेहनत मला करावी लागणार आहे…’

हे सुद्धा वाचा

पुढे मलायका म्हणाली, ‘रोज मला स्वतःला सिद्ध करुन दाखवायचं होतं. जेव्हा माझ्या नावापुढे खान आडनाव लागलं होतं तेव्हा आणि मी जेव्हा खान नावा शिवाय माझ्या घरी आली… अशा दोन्ही परिस्थितीत मी काम करत होती… तू खान आडनाव सोडून फार मोठी चूक करत आहेस… हे देखील मला अनेकांनी सांगितलं… ‘

‘खान या आडनावाचं इंडस्ट्रीमध्ये काय महत्त्व आहे, हे तुला माहिती नाही. माझ्या पूर्वीच्या सासरच्या मंडळींसाठी माझ्या मनात प्रेम आहे. त्यांच्याकडून मला भरपूर प्रेम मिळालं. माझा एक मुलगा आहे आणि मी कुटुंबाचा एक भाग आहे. पण मला माझ्या आडनावाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये उभं राहायचं होतं.’

‘गोष्ट फक्त आडनावापर्यंत मर्यादित नव्हतं… मी माझ्या माहेरी आली तेव्हा मला कळलं की मी काही तरी करु शकते…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिची चर्चा रंगली आहे. सध्या मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूर एकमेकांना डेट करत आहेत.

बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.