Nana Patekar यांच्या घरी ऋषी कपूर दारुची बाटली घेवून पोहोचले तेव्हा…, अनेक वर्षांनंतर किस्सा समोर

Nana Patekar | नाना पाटेकर यांचं घर, दारुची बाटली, ऋषी कपूर यांनी दिलेला 'तो' सल्ला... सध्या सर्वत्र नाना पाटेकर यांनी अनेक वर्षांनंतर सांगितलेला किस्सा चर्चेत... 'द व्हॅक्सीन वॉर' सिनेमामुळे सध्या नाना पाटेकर चर्चेत आहेत... गेल्या काही दिवसांपासून नाना पाटेकर अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत आहेत...

Nana Patekar यांच्या घरी ऋषी कपूर दारुची बाटली घेवून पोहोचले तेव्हा..., अनेक वर्षांनंतर किस्सा समोर
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 12:03 PM

मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज देखील त्यांचे डायलॉग आणि अभिनय चाहते विसरु शकलेले नाही. आजही नाना पाटेकर यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. एवढंच नाही तर, नाना पाटेकर यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक खास गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकताच नाना पाटेकर ‘द व्हॅक्सीन वॉर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाना पाटेकर त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याने एका गोष्टीमुळे नाना पाटेकर यांना अभिनेय सोडण्याचा सल्ला दिला होता.

ज्यांनी नाना पाटेकर यांना अभिनय सोडण्याचा सल्ला दिला, ते दुसरे तिसरे कोणी नसून दिवंगत अभिनेते ऋषी कपूर होते. नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांनी ‘हम दोनो’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमातील दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं. आज देखील लोकं ‘हम दोनो’ सिनेमा विसरु शकलेले नाहीत.

नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांची मैत्री

नाना पाटेकर आणि ऋषी कपूर फक्त सहकलाकार नव्हते, तर देघो चांगले मित्र देखील होते. एक दिवस नाना पाटेकर यांच्या घरी ऋषी कपूर पोहोचले होते, तेव्हा नक्की काय झालं होतं. याबद्दल मोठं वक्तव्य नाना पाटेकर यांनी अनेक वर्षांनंतर केलं आहे. नाना पाटेकर यांनी त्यांच्या मैत्रीचा किस्सा सांगितला आणि ऋषी कपूर यांच्या आठवणींमध्ये रमले…

हे सुद्धा वाचा

नाना पाटेकर म्हणाले, ‘ऋषी कपूर माझे चांगले मित्र होते. शिवाय ते चांगले व्यक्ती देखील होते. ते कायम माझ्या घरी यायचे. एक दिवस तर दारुची बाटली घेवून आले होते. त्यादिवशी आम्ही एकत्र बसून खिमी रोटी खाल्ली. तेव्हा ऋषी कपूर मला म्हणाले, अभिनय तुम्ही ठिकठाक करता, पण जेवण मात्र उत्तम बनवता… अभिनय सोडून टाका, मी तुम्हाला एक हॉटेल सुरु करुन देतो..’ सध्या नाना पाटेकर यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत आहे.

‘द वॅक्सीन वॉर’ सिनेमामुळे नाना पाटेकर चर्चेत

ऋषी कपूर व्यतिरिक्त नाना पाटेकर यांची मैत्री अनिल कपूर आणि डॅनी डेन्झोंगपा यांच्यासोबत देखील चांगली आहे. नाना पाटेकर सध्या ‘द वॅक्सीन वॉर’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.