सलमान खान ‘द कपिल शर्मा शोमध्ये’ लोरेन्सला भेटला तेव्हा…, म्हणाला, ‘लहानपणापासून तू माझा…’

Salman Khan: कपिल शर्मा शोमध्ये सलमान खान आणि लॉरेन्सची झालेली भेट, लॉरेन्स म्हणाला होता, 'लहानपणापासून तू माझा...' , व्हिडीओ समोर, गेल्या काही दिवसांपासून सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर...

सलमान खान 'द कपिल शर्मा शोमध्ये' लोरेन्सला भेटला तेव्हा..., म्हणाला, 'लहानपणापासून तू माझा...'
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 9:57 AM

Salman Khan: अभिनेता सलमान खान याच्या जीवाला गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि बिश्नोई गँग पासून धोका आहे. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबार आणि हत्या प्रकरणानंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे सलमान खान याचे चाहते देखील चिंतेत आहेत. सांगायचं झालं तर, सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्याला भेटण्यासाठी चाहते देखील कायम उत्सुक असतात. दरम्यान, सलमान खान अशा एका चाहत्याला भेटला होता ज्याचं नाव लॉरेन्स होतं. दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होता.

सलमान खान आणि चाहता लॉरेन्स यांची भेट विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये झाली होती. शोमध्ये कपिल शर्माने प्रेक्षकांना विचारलं, असा कोणी चाहता आहे ज्याने सलमान खान याच्यासाठी काही हटके केलं आहे? तेव्हा भाईजानचा एक चाहता उठतो आणि स्वतःची ओळख लॉरेन्स अशी करुन देतो.

लॉरेन्स स्वतःला सलमान खान याचा मोठा चाहता असल्याचं सांगतो. चाहता म्हणतो, ‘सलमान खान याचा ‘मैंने प्यार किया’ सिनेमा पाहिला तेव्हापासून आजपर्यंत माझ्या मनात सलमान खान याच्यासाठी वेगळी जागा आहे’ नोकरी लागल्यानंतर पहिल्या पगारातून सलमान खान याच्या ब्रेसलेटसारखाच ब्रेसलेट मी स्वतःला भेट म्हणून दिला… असं देखील चाहता म्हणाला.

हे सुद्धा वाचा

‘कपिल शर्मा शो’ मधील सलमान खान याचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. एकीकडे सलमान याच्या चाहत्याचं नाव देखील लॉरेन्स आहे. तर दुसरीकडे सलमान खान याच्या शत्रूचं नाव देखील लॉरेन्स आहे. ज्याने सलमान खान याला अनेकदा जीवेमारण्याची धमकी दिली आहे. सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी

धमकीसह बिश्नोई गँगने भांडण संपवण्यासाठी सलमान खान याच्याकडे तब्बल 5 कोटी रुपयांची मागणी केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानला 5 कोटी रुपये देण्याची मागणी करणारा धमकीचा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाला आहे. धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा केला जात आहे.

जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानचे नशीब माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यापेक्षा वाईट होईल…. अशी धमकी अभिनेत्याला देण्यात आली आहे. सध्या सलमान खानला धमकी मिळालेल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....