Katrina Kaif: मी आता स्ंटटमॅन नाही, कतरिनाचा सासरा…, ‘या’ पुरुषाचं लक्षवेधी वक्तव्य

Katrina Kaif: अभिनेत्री कतरिना कैफ हिने विकी कौशल याच्यासोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर 'या' पुरुषाचं लक्षवेधी वक्तव्य 'मी आता स्ंटटमॅन नाही, कतरिनाचा सासरा...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कतरिना कैफच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Katrina Kaif: मी आता स्ंटटमॅन नाही, कतरिनाचा सासरा..., 'या' पुरुषाचं लक्षवेधी वक्तव्य
Follow us
| Updated on: Sep 02, 2024 | 1:43 PM

अभिनेत्री कतरिना कैफ हिचं नाव सुरुवातील अभिनेता सलमान खान आणि त्यानंतर अभिनेता रणबीर कपूर यांच्यासोबत जोडलं गेलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. रणबीर कपूर याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर कतरिना हिने अनेक वाईट गोष्टींचा सामना केला. अखेर कतरिना हिच्या आयुष्यात अभिनेता विकी कौशल याची एन्ट्री झाली. कतरिना आणि विकी यांनी 9 डिसेंबर 2021 मध्ये राजस्थान याठिकाणी शाही थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

लग्नानंतर विकी – कतरिना यांना अनेकदा कुटुंबियांसोबत देखील स्पॉट करण्यात आलं. एवढंच नाही तर, कतरिना हिने सासरे आणि विकीचे वडील शाम कौशल कायम सून कतरिना हिचं कौतुक करताना दिसतात. सोशल मीडियावर कौशल कुटुंबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

एका मुलाखतीत शाम कौशल यांनी ‘कतरिना आमच्या घरातील सून नाही तर, मुलगी आहे… आमच्या घरात मुलगी आली आहे…’ असं वक्तव्य केलं होतं. ‘कतरिना आता पंजाबी संस्कृती शिकत आहे. पंजाबी शिकत आहे. आम्ही आता वेग-वेगळ्या भाज्या खातो कारण कतरिनाला भाज्या खूप आवडतात…’

पुढे शाम कौशल म्हणाले, ‘आता लोकं मला जेव्हा विचारतात आता मी माझी ओळख कशी करुन दिली पाहिजे? तेव्हा मी लोकांना सांगतो, मी आता स्टंटमॅन नाही तर, विकी – सनी यांचा बाप आणि कतरिना कैफ हिचा सासरा आहे.’ असं देखील शाम कौशल एका मुलाखतीत म्हणाले होते.

कतरिना कैफ हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील कतरिना कायम चर्चेत असते. कतरिना सोशल मीडियावर कायम विकीसोबत फोटो पोस्ट करत पतीवर असलेलं प्रेम व्यक्त करत असते.

कतरिना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर कतरिना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.