करिश्मा कपूर एकटी असताना बेडरुममध्ये इसम व्यक्ती घूसला तेव्हा…, अभिनेत्रीसोबत त्याने केलं असं कृत्य
Karisma Kapoor: करिश्मा कपूर एकटी असताना बेडरुमध्ये घुसून अज्ञात व्यक्तीने केलं असं कृत्य... प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर..., फार कमी लोकांना माहितीये ही घटना, करिश्मा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत

Karisma Kapoor: अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या करियरबद्दल तर प्रत्येकाला माहिती आहे. पण अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. करिश्मा कपूर हिच्यासोबत अशी एक घटना घडली होती, ज्यामुळे अभिनेत्री प्रचंड घाबरली होती. हे प्रकरण पोलिसांपर्यंत देखील पोहचलं. सांगायचं झालं तर, हे प्रकरण तेव्हाचं आहे, जेव्हा करिश्मा कपूरच्या घरात फर्निचरचं काम सुरु होतं. तेव्हा घरात काम करणाऱ्या एका कारपेंटरने असं काम केलं ज्यामुळे अभिनेत्रीला मोठा झटका लागला.
कारपेंटर घरात काम होते. तेव्हा करिश्मा घरात एकटीच असल्याचं एका कारपेंटरला कळलं. अशात कारपेंटर संधी साधत करिश्माच्या बेडरुममध्ये घुसला आणि तेव्हा रुममध्ये कोणीतरी घुसलं आहे असा भास अभिनेत्रीला झाली नाही. यायाच फायदा घेत कारपेंटरने करिश्माची पर्स चोरली.




ही गोष्ट अभिनेत्री कळल्यानंतर करिश्मा प्रचंड घाबरली. त्यानंतर तात्काळ अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करत त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि करिश्माची पर्स तिला परत मिळाली.
View this post on Instagram
अभिनेत्रीने घरात पर्स शोधली मात्र तिला पर्स सापडली नाही. त्यानंतर करिश्माने ही बाब पोलिसांना कळवली. तिच्या अनेक मौल्यवान वस्तूही त्या पर्समध्ये ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीला पकडलं आणि करिश्माची पर्स त्यांना परत केली.
करिश्मा हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘राजा हिंदुस्तानी’,’राजा बाबू’, ‘दिल तो पागल है’, ‘बीवी नम्बर वन’ अशा एकापेक्षा एका सिनेमांमध्ये काम केलं आहे. आज अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत.
घटस्फोटानंतर करिश्मा दोन मुलांचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करत आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.