Shilpa Shetty | घटस्फोटानंतर काय करते राज कुंद्रा याची पहिली पत्नी, कुठे आहे अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची सवत?

कुठे आहे शिल्पाची सवत? मुलगी दोन महिन्यांची असताना राज कुंद्रा पहिल्या पत्नीपासून झाला विभक्त...सध्या सर्वत्र राज कुंद्रा याची पहिली पत्नी आणि मुलीची चर्चा...

Shilpa Shetty | घटस्फोटानंतर काय करते राज कुंद्रा याची पहिली पत्नी, कुठे आहे अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची सवत?
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 4:32 PM

मुंबई | प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने २२ नोव्हेंबर २००९ मध्ये श्रीमंत उद्योजक राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर २०१२ मध्ये अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला. राज आणि शिल्पा यांच्या मुलाचं नाव वियान कुंद्रा असं आहे. त्यानंतर २०२० मध्ये अभिनेत्रीने सरोगेसीच्या मदतीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अभिनेत्रीच्या मुलीचं नाव समीशा असं आहे. अभिनेत्रीला कायम तिच्या दोन मुलांसोबत स्पॉट केलं जातं. शिल्पा ही राज कुंद्रा याची दुसरी पत्नी आहे. राज कुंद्रा याच्या पहिल्या पत्नीबद्दल फार कोणाला माहिती नाही. राज कुंद्रा याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर उद्योजकाची पहिली पत्नी काय करते, ती कुठे आहे.. याबद्दल आज जाणून घेवू. शिवाय राज कुंद्रा आणि पहिल्या पत्नीची एक मुलगी देखील आहे. पण राज पहिल्या पत्नीच्या मुलीला कधीही भेटत नसल्याचं देखील अनेकदा समोर आलं.

राज कुंद्रा याचं पहिलं लग्न २००३ साली कविता कुंद्रा हिच्यासोबत झालं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. २००६ मध्ये राज आणि कविता यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, शिल्पा शेट्टी हिच्यामुळे राज आणि कविता यांच्या नात्यात दुरावा आल्याचे आरोप राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीने केले होते. यावर शिल्पाने देखील मौन सोडलं होते…

घटस्फोटानंतर राज आणि माझी ओळख झाली.. असं शिल्पा शेट्टी स्वतःवर करण्यात आलेले आरोप फेटाळत म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे, राज कुंद्रा याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर कविता कुंद्रा परदेशात शिफ्ट झाली आहे. शिवाय आता कविता तिच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत आहे. कविता आणि राज यांची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती.

हे सुद्धा वाचा

लग्नाआधी राज आणि कविता यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्याचं देखील सांगितलं जातं. जेव्हा दोघांचा घटस्फोट झाला, तेव्हा त्यांची मुलगी फक्त दोन महिन्यांची होती. रिपोर्टनुसार, न्यायालयाने राज कुंद्रा याला मुलीला भेटण्याची परवानगी दिली आहे. पण राज कधीही त्याच्या पहिल्या मुलीला भेटलेला नाही. अखेर कविता परदेशात निघून गेली. आता कविताची मुलगी १६ वर्षांची आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. अनेकदा शिल्पा शेट्टी ही आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडीओ शेअर करते. शिवाय अभिनेत्री कुटुंबासोबत देखील व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.