Akanksha Dubey | आकांक्षाला मध्यरात्री हॉटेलमध्ये पोहोचवण्यासाठी कोण आला होता? रुममध्येही गेला अन्..

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आकांक्षाच्या रुमचा दरवाजा उघडला गेला नाही तेव्हा सर्वजण चिंतेत होते. हॉटेल रुममधली लाइट सुरू होती आणि बाथरुममधील नळसुद्धा सुरूच होता. मास्टर कीच्या मदतीने आकांक्षाच्या रुमचा दरवाजा उघडला गेला तेव्हा...

Akanksha Dubey | आकांक्षाला मध्यरात्री हॉटेलमध्ये पोहोचवण्यासाठी कोण आला होता? रुममध्येही गेला अन्..
Akanksha DubeyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 12:17 PM

वाराणसी : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येच्या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 25 वर्षीय आकांक्षाने वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये आपलं आयुष्य संपवलं. तिच्या आत्महत्येनंतर असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत. टोकाचं पाऊल उचलण्याच्या काही तास आधी ती पूर्णपणे ठीक होती. मग मध्यरात्री हॉटेल रुमवर पोहोचल्यानंतर असं काय घडलं, ज्यामुळे आकांक्षाने हे धक्कादायक पाऊल उचललं, असा प्रश्न अनेकांच्या मनात घोंघावत आहे. वाराणसीमध्ये ती एका शूटिंगनिमित्त गेली होती. शनिवारी रात्री आकांक्षा कुठे होती आणि काय करत होती यावरून आता पडदा उचलण्यात आला आहे.

आकांक्षाच्या हेअरस्टायलिस्टने हे स्पष्ट केलंय की शनिवारी रात्री ती हॉटेलवरून एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. रविवारी सकाळपासूनच तिच्या शूटिंगला सुरुवात होणार होती. इतर क्रू मेंबर्ससोबत ती वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये थांबली होती.

हे सुद्धा वाचा

एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या हॉटेलमध्ये आकांक्षा राहिली, तिथल्या मॅनेजरने शनिवारी रात्री काय काय घडलं, याबाबतचा खुलासा केला आहे. मॅनेजने दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री 1 वाजून 55 मिनिटांनी हॉटेलवर परतली होती.

मॅनेजरने असाही दावा केला आहे की आकांक्षा हॉटेलवर एकटीच आली नव्हती. तिच्यासोबत एक तरुणसुद्धा होता. आकांक्षा हॉटेलवर आली तेव्हा ती स्वत: नीट उभी राहू शकत नव्हती. तिच्यासोबत आलेल्या तरुणाने तिला रुमपर्यंत नेलं आणि जवळपास 17 मिनिटांपर्यंत तो तिच्या रुममध्येच होता. त्यानंतर तो तिथून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आकांक्षाच्या रुमचा दरवाजा उघडला गेला नाही तेव्हा सर्वजण चिंतेत होते. हॉटेल रुममधली लाइट सुरू होती आणि बाथरुममधील नळसुद्धा सुरूच होता. मास्टर कीच्या मदतीने आकांक्षाच्या रुमचा दरवाजा उघडला गेला तेव्हा ती मृतावस्थेत आढळली. आकांक्षाच्या मृत्यूचं प्राथमिक कारण आत्महत्या मानत पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

आकांक्षा दुबे तीन वर्षांची असतानाच आईवडिलांसोबत मुंबईला राहायला आली. तिने आयपीएस अधिकारी व्हावं अशी तिच्या पालकांची इच्छा होती. मात्र आकांक्षाला लहानपणापासूनच डान्स आणि अभिनयात रस होता. आकांक्षाचा जन्म 21 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तरप्रदेशमधल्या मिर्झापूरमध्ये झाला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तर आकांक्षाचे टिकटॉक व्हिडीओसुद्धा तुफान व्हायरल झाले होते. भोजपुरी इंडस्ट्रीची ड्रीम गर्ल या नावाने ती ओळखली जायची.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.