आठवडाभरापूर्वीच साजरा केला वाढदिवस; ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्रीवर काळाचा घाला

कोण आहे कल्याणी जाधव? अपघातात दुर्दैवी मृत्यू

आठवडाभरापूर्वीच साजरा केला वाढदिवस; 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्रीवर काळाचा घाला
अभिनेत्री कल्याणी जाधवImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 1:07 PM

कोल्हापूर- ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचा अपघातात मृत्यू झाला. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा याठिकाणी एका डंपरच्या धडकेत कल्याणीने आपले प्राण गमावले. कल्याणीच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. कल्याणीने तुझ्यात जीव रंगला या मालिकेशिवाय इतरही काही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

आठवडाभरापूर्वीच साजरा केला होता वाढदिवस

आठवडाभरापूर्वीच कल्याणीने वाढदिवस साजरा केला होता. यानिमित्त तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला. मला खूप आनंद झाला. मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही, ना पार्टी केली. मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं आहे. असंच प्रत्येक वाढदिवसाला होऊ दे. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत. मला हे सगळं करण्यासाठी शक्ती द्या,’ अशी पोस्ट तिने लिहिली होती. त्याचसोबत भाकरी थापतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.

हे सुद्धा वाचा

कल्याणीने अलीकडेच हालोंडी फाटा याठिकाणी स्वत:चं हॉटेल सुरू केलं होतं. प्रेमाची भाकरी असं त्या हॉटेलचं नाव आहे. मध्यरात्री हॉटेल बंद करून घरी परतत असताना तिला डंपरेन धडक दिली.

कल्याणीने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतही काम केलं होतं. तिचं स्वत:चं युट्यूब चॅनलही आहे. त्यावर ती विविध व्हिडीओ पोस्ट करायची. इन्स्टाग्रामवरही कल्याणी विविध फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करायची.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.