Shah Rukh Khan: शाहरुख खानची बहीण का जगतेय अज्ञातवासाचं जीवन? लाइमलाइटपासून राहते दूर

शाहरुख खानची बहीण शहनाजचं पूर्ण नाव शहनाज लालारुख खान असं आहे. सोशल मीडियावर शहनाजचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Shah Rukh Khan: शाहरुख खानची बहीण का जगतेय अज्ञातवासाचं जीवन? लाइमलाइटपासून राहते दूर
Shah Rukh Khan: शाहरुख खानची बहीण का जगतेय अज्ञातवासाचं जीवन? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 12:20 PM

मुंबई: बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खानच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला चाहते ओळखतात. पत्नी गौरी खान, मुलगा आर्यन आणि अबराम, मुलगी सुहाना खान हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मात्र शाहरुखच्या कुटुंबात अशीही एक व्यक्ती आहे, जी नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिली आहे. ही व्यक्ती आहे, शाहरुखची बहीण शहनाज खान. म्हणूनच तिच्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे.

शाहरुख खानची बहीण शहनाजचं पूर्ण नाव शहनाज लालारुख खान असं आहे. सोशल मीडियावर शहनाजचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुखसोबत तिचे लहानपणीचे फोटो पहायला मिळत आहेत. शहनाजला अनेकदा शाहरुख आणि गौरीच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये पाहिलं गेलं आहे. इतकंच नव्हे तर आर्यन खान जेव्हा तुरुंगातून बाहेर पडला, तेव्हासुद्धा ती त्याला भेटायला मन्नत बंगल्यावर गेली होती.

हे सुद्धा वाचा

शहनाज गेल्या बऱ्याच वर्षांपासून डिप्रेशनचा सामना करत होती. वडिलांच्या निधनानंतर तिला खूप मोठा धक्का बसला. याविषयी खुद्द शाहरुख एका मुलाखतीत व्यक्त झाला होता.

View this post on Instagram

A post shared by Samina ✨ (@srkssamina)

शाहरुखने त्याच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याची बहीण शहनाज खूप शिकलेली आहे. मात्र एका घटनेमुळे तिच्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम झाला. “वडिलांच्या निधनाच्या दु:खातून ती कधी सावरू शकली नाही. त्यांच्या पार्थिवाकडे ती एकटक बघत राहिली. ती रडतही नव्हती आणि काही बोलतही नव्हती”, असं त्याने सांगितलं होतं.

“दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शहनाज खूप आजारी पडली होती. त्यावेळी तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. डॉक्टरांनीही तिची जगण्याची शक्यता खूप कमी असल्याचं सांगितलं होतं. मी तिला स्वित्झर्लंडला घेऊन गेलो आणि तिथे उपचार केले. एकीकडे माझ्या बहिणीवर उपचार सुरू होते आणि दुसरीकडे माझ्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं”, असं तो म्हणाला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.