कोण आहे श्वेता तिवारीची सवत? जिने नवऱ्याला केलं पूर्ण उद्ध्वस्त
श्वेता तिवारीला घटस्फोट दिल्यानंतर राजा चौधरीने कोणासोबत थाटला दुसरा संसार, कोण आहे अभिनेत्रीची सवत? जिने नवऱ्याला केलं पूर्ण उद्ध्वस्त, श्वेता कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. श्वेत तिवारी हिने पहिलं लग्न राजा चौधरी याच्यासोबत केलं. श्वेता आणि राजा यांना एक मुलगी देखील आहे. तिचं नाव पलक तिवारी असं आहे. मुलीच्या जन्मानंतर देखील श्वेता आणि राजा यांचं नातं टिकलं नाही. अखेर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. श्वेता हिने नवऱ्यावर अनेक गंभीर आरोप केले. श्वेता तिवारी हिला घटस्फोट दिल्यानंतर राजाने दुसरा संसार थाटला. पण राजाचं दुसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. राजाच्या दुसऱ्या पत्नीने देखील त्याच्यावर गंभीर आरोप केले.
श्वेता तिवारी हिच्या सवतीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. श्वेता तिवारी हिच्या सवतीचं नाव देखील श्वेता सूद असं आहे. दुसऱ्या लग्नानंतर श्वेता सूद हिने नवऱ्याचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. दुसऱ्या लग्नाबद्दल खुद्दा राजा चौधरी याने मोठा खुलासा केला.
राजा चौधरीने सांगितलं की, लग्नाच्या काही दिवसांनंतर राजा आणि श्वेता सूदमध्ये वाद सुरू झाले. दोघांमधील वाद इतके टोकाला गेली की, श्वेताने राजाला घटस्फोटाची कागदपत्रे दिली. घटस्फोटादरम्यान श्वेता सूदने राजा चौधरी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पोटगीची मागणी केली होती.




त्यामुळे राजा चौधरी यांची प्रकृती बिघडली होती. यावेळी श्वेता सूदने राजा यांच्यावर मारहाणीचा आरोपही केला होता. एवढंच नाही तर, दुसऱ्या पत्नीमुळे राजाला तुरुंगवास देखील भोगावा लागला. याच दरम्यान श्वेता सूद हिची प्रकृती देखील खालावली होती.
श्वेता तिवारी हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या घटस्फोटानंतर श्वेता हिने अभिनव कोहली याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. श्वेताने दुसऱ्या नवऱ्यावर घरगुती हिंसाचार आणि मुलीचा छळ करत असल्याचे आरोप केले. श्वेताचं दुसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. मुलगा रेयांश याच्या जन्मानंतर श्वेता तिवारी हिने अभिनव याच्यासोबत घटस्फोटाचा निर्णय घेतला.
श्वेता तिवारी आता दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील श्वेता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.