कोण होणार ‘बिग बॉस 17’ चा विजेता? अखेर नाव आलं समोर, एमसी स्टॅन काय म्हणाला?

बिग बॉसचा सतरावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. वीकेंड का वार एपिसोडमध्ये विविध पाहुणे हजेरी लावतात. यावेळी प्रसिद्ध रॅपर आणि बिग बॉसचा माजी विजेता एमसी स्टॅन प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे. त्याने बिग बॉसचा नवीन विजेता कोण होणार, याविषयी वक्तव्य केलंय.

कोण होणार 'बिग बॉस 17' चा विजेता? अखेर नाव आलं समोर, एमसी स्टॅन काय म्हणाला?
MC StanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 11:11 AM

मुंबई : 18 नोव्हेंबर 2023 | सलमान खानच्या ‘बिग बॉस 17’ या शोच्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये प्रसिद्ध रॅपर आणि माजी विजेता एसमी स्टॅन येणार आहे. एमसी स्टॅनने बिग बॉसच्या सोळाव्या सिझनचं विजेतेपद जिंकलं होतं. आता बिग बॉसच्या घरात तो त्याच्या नवीन गाण्याच्या प्रमोशनसाठी येणार आहे. ‘फर्रे’ या चित्रपटातील एक गाणं एमसी स्टॅनने गायलं आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या मंचावर एमसी स्टॅन केवळ गाणं गाणारच नाही तर सलमानसोबत मिळून खूप धमालसुद्धा करणार आहे. या एपिसोडमध्ये स्टॅन बिग बॉसच्या विजेत्याबद्दल सांगणार आहे.

‘बिग बॉस 17’मधील स्पर्धक मुनव्वर फारुकी आणि एमसी स्टॅन हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. जेव्हा स्टॅन बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून होता, तेव्हा मुनव्वरने त्याची खूप साथ दिली. आता एमसी स्टॅन हा मुनव्वरला पाठिंबा देताना दिसणार आहे. इतकंच नव्हे तर एमसी स्टॅनने बिग बॉसच्या मंचावर आपला मित्र मुनव्वर फारुकीला विजेता घोषित केलं आहे. मुनव्वरच हा शो जिंकणार, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. यावर बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

मुनव्वर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन आहे. त्याचे अनेक शोज विविध कारणांमुळे चर्चेत आले आहेत. अनेकदा त्याच्या शोजवरही बंदी घालण्यात आली आहे. बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी त्याने कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये भाग घेतला होता. या शोचं विजेतेपद त्याने पटकावलं होतं. आता बिग बॉससाठी तो एका आठवड्यासाठी तब्बल 7 ते 8 लाख रुपये मानधन घेतोय.

मुनव्वर फारुकी हा मूळचा गुजरातच्या जुनागडचा आहे. तिथून तो वडिलांसोबत मुंबईतील डोंगरी परिसरात राहायला आला. सुरुवातीला त्याने काही छोटी-मोठी कामंसुद्धा केली आहेत. 2019 मध्ये तो स्टँडअप कॉमेडीकडे वळला. गेल्या दोन वर्षांत त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. युट्यूबवर त्याने लाखो सबस्क्राइबर्स आहेत. स्टँडअप कॉमेडी करताना अनेकदा मुनव्वर फारुकीच्या विनोदांवर आक्षेपही घेण्यात आला. त्याच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. इतकंच नव्हे तर त्याला पोलिसांनी अटकही केली होती.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.