Rekha | ‘कोणत्या महिलेसोबत लग्न का करु शकत नाही?’, दुसऱ्या लग्नाबद्दल रेखा यांचं मोठं वक्तव्य

पतीने स्वतःला संपवल्यानंतर जेव्हा रेखा यांनी दुसऱ्या लग्नाबद्दल केलं मोठं वक्तव्य...सध्या सर्वत्र रेखा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे... दुसऱ्या लग्नाबद्दल असं का म्हणाल्या अभिनेत्री?

Rekha | 'कोणत्या महिलेसोबत लग्न का करु शकत नाही?', दुसऱ्या लग्नाबद्दल रेखा यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 9:43 AM

मुंबई | 24 जुलै 2023 :  अभिनेत्री रेखा आज बॉलिवूडपासून दूर असल्या तरी त्यांच्या खाजगी आयुष्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर कायम रंगलेल्या असतात. वयाच्या ६८ व्या वर्षी रेखा यांचं सौंदर्य सर्वांना घायाळ करतात. रेखा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी सोशल मीडियावर मात्र त्यांचे जुने फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. एक काळ असा होता जेव्हा रेखा यांच्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य केलं. रेखा यांना प्रोफेशनल आयुष्यात यश तर मिळालं पण, त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र अनेक चढ – उतार आले. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना रेखा यांचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतही त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. पण महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या रेखा यांच्या नात्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेली असते.

अमिताभ आणि रेखा यांचं नातं तुटल्यानंतर अभिनेत्रीने उद्योजक मुकेश अग्रवाल (Mukesh Aggarwal) यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही… असं सांगण्यात येतं. रेखा यांनी सेमी ग्रेवाल यांच्या शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मौन सोडलं.

शोमध्ये सेमी ग्रेवाल यांनी रेखा यांना लग्नाबद्दल देखील विचारलं. यावर रेखा म्हणाल्या, ‘एका पुरुषासोबत लग्न? असं विचारत आहात का तुम्ही..’ रेखा यांच्या प्रतिक्रियेवर सेमी ग्रेवाल देखील हैराण झाल्या आणि म्हणाल्या, ‘हो पुरुषासोबत लग्न… महिलेसोबत तर करणार नाही ना लग्न?’ यावर रेखा विनोदी अंदाजात म्हणाल्या, ‘महिलेसोबत लग्न करण्यास काय हरकत आहे…’ रेखा यांच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ माजली होती. पण आजही रेखा गडगंज संपत्ती असून एकट्या राहतात.

हे सुद्धा वाचा

याच मुलाखती सिमी यांनी रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर असलेल्या प्रेमाबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत रेखा म्हणाल्या, ‘अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे. आज असा कोणी पुरुष, महिला, लहान मुलं, वृद्ध नाहीत जे बिग बी यांच्यावर प्रेम करत नाहीत. तर मी कशी बाजूला राहू शकते..’ सिमी ग्रेवाल यांनी रेखा यांच्या घेतलेल्या मुलाखतीची चर्चा तुफान रंगली.

‘सिलसिला’, ‘खून भरी मांग’, ‘उमराव जान’, ‘खिलाडीओ का खिलाडी’, ‘कोई मिल गया’, ‘दिल है तुम्हारा..’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्री रेखा यांनी महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण खासगी आयुष्यात मात्र रेखा यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.

Non Stop LIVE Update
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?.
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?.
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा..
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा...
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?.