करोडोंची संपत्ती तरीही Salman Khan अजूनही 1BHK फ्लॅटमध्ये का राहतो? त्याचं उत्तर कदाचित तुमचं मन जिंकेल
बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान आजही एका छोट्या फ्लॅटमध्ये राहतो. हे अनेकांना माहित नसेल. काय आहे त्या मागचं कारण? सलमानने खुद्द सांगितलं.
मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमानची स्टाईलची चर्चा सर्वत्र असते. सलमान खान याने आजपर्यंत अनेक चित्रपटांमधून त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय. त्याची जादू आजही बॉलिवूडमध्ये कायम आहे. सलमान खान जेथे जातो तेथे गर्दी होतेच. अफाट यश, संपत्ती कमवली असती तरी देखील सलमान खान हा आजही एका फ्लॅटमध्ये राहतो. भाईजान आज एका मोठा बंगला खरेदी करु शकतो. पण तरी देखील तो मुंबईत एका छोट्या फ्लॅटमध्ये राहतो. सलमान खान याने त्याच्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिलेत. पण त्याची फॅनफॉलोईंग कुठीही कमी झालेली नाही. पण सलमान खान एका छोट्या फ्लॅटमध्ये का राहतो. याचं उत्तर खुद्द सलमान खानने दिले आहे.
View this post on Instagram
सलमान खान याने 2019 मध्ये एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्याने 10-12 वर्षांपूर्वी एक बंगला पाहिला होता. 22 कोटींमध्ये खूप चांगली जागा मिळत होती. सलीन खान यांनी सलमानला सांगितले की, एवढी चांगली जागा असेल तर खरेदी करू. ‘आम्ही जागेच्या मालकाला फोन केला, तो घरी आला तेव्हा वडिलांनी सांगितले की ती जागा खूप छान आहे, सलमानला ती आवडते, पण एक अडचण आहे. त्यानंतर मालकाने सांगितले की, सलीम साहेब, अशी कोणतीही समस्या नाही जी सोडवता येत नाही.”
सलमान खानने मुलाखतीत पुढे सांगितले की, ‘डॅडी म्हणाले तु्म्ही ही डील कन्फर्म समजा. जागेचा मालक यानंतर हात मिळवण्यासाठी पुढे आला. त्यानंतर त्याने प्रश्न केला की, सलीम साहेब तशी समस्या काय होती? हे ऐकून सलीम खान म्हणाले की, तुमची जागा 22 कोटींची आहे, समजा आमच्याकडे 20 कोटी कमी आहेत. यानंतर सलमान खान म्हणाला, आम्ही आधी हजारांमध्ये सॉर्ट होतो. मग लाखोंमध्ये आणि आता थेट करोडोंमध्ये. यानंतर सलमान खान याने कधीच घर खरेदी करण्याचा विचार केला नाही.
मीडिया रिपोर्ट्नसनुसार, सलमान आणि त्याचे वडील सलीम खान ज्या जागेबाबत चर्चा करत होते. त्याच जागी आज शाहरुख खानचा मन्नत हा बंगला आहे. शाहरुखच्या आधी सलमान खान ती जागा घेणार होता.
सलमान खानचा नवा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. सलमान खान सोबत या सिनेमात पूजा हेगडे आणि शहनाज गिल देखील दिसणार आहेत. सिनेमाचे २ गाणे आधीच चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहेत. त्यामुळे सिनेमाची उत्सूकता सलमानच्या चाहत्यांमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram