Hardik Pandya Divorce: ‘संयम ठेवावा लागतो कारण…’, का असं म्हणाला होता हार्दिक पांड्या?
Hardik Pandya And Natasha Stankovic Divorce: हार्दिक पांड्या - नताशा स्टेनिकोविक यांचा अखेर घटस्फोट, हार्दिक पांड्या याचं लक्षवेधी वक्तव्य, 'संयम ठेवावा लागतो कारण...', चर्चांना उधाण... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नताशा - हार्दिक यांच्या घटस्फोटाची चर्चा...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची पत्नी नताशा स्टेनिकोविक सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. लग्नाच्या 4 वर्षांनंतर हार्दिक – नताशा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर एक पोस्ट करत हार्दिक – नताशा यांनी घटस्फोटाची पोस्ट केली. दरम्यान नताशा हार्दिक यांचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये हार्दिक याने पहिली पत्नी नताशा हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर हार्दिक – नताशा यांच्या लग्नाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हार्दिक – नताशा स्वतःच्या लग्नाचा आनंद लुटताना दिसत आहे. लग्नाच्या वेळी हार्दिक म्हणाला होता, ‘ज्याप्रकारे नताशा हिने माझ्यावर प्रेम केलं आहे. त्यामुळे अनेक गोष्टी माझ्यासाठी स्पष्ट झाल्या आहेत. कठीण काळत धैर्य कसा बाळगावा हे नताशाने मला शिकवलं आहे.’
‘लव्ह लाईफमुळे मला माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत… मी पूर्वीपेक्षा अधिक संयमी झालो आहे. कारण नताशासोबत राहण्यासाठी खूप संयम लागतो…. ‘ असं हार्दिक म्हणाला होता. नात्यात प्रेम आणि आदर असून देखील दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.
हार्दीक आणि नताशा यांचं लग्न
हार्दिक पांड्या – नताशा स्टँकोव्हिच यांना 2020 मध्ये साध्या पद्धतीत लग्न करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. 31 मे 2020 मध्ये दोघांनी कोर्टमॅरिज केलं. लग्नाच्या 2 महिन्यांनंतर दोघांनी मुलाचं जगात स्वगत केलं.त्यानंतर 2023 मध्ये हार्दिक – नताशा यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. एवढंच नाहीतर, हार्दिक, नताशा हिच्या कुटुंबियांना देखील लग्नाच्या दोन वर्षांनंतर भेटला होता.
नताशा – हार्दिक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, नताशा हिने भारत देश सोडल्यानंतर हार्दिक याने घटस्फोट झाल्याची घोषणा केली. दोघांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. घटस्फोट झाला असला तरी मुलाला कोणत्याच गोष्टीची कमी भासू देणार नाही… असं देखील नताशा – हार्दिक म्हणाले आहेत.
हार्दिक – नताशा यांचा घटस्फोट झाला असला तर, पांड्या कुटुंबावर असलेलं नताशा हिचं प्रेम कमी झालेलं नाही. कारण नताशा हिने शुक्रवारी कृणाल पांड्या याच्या मुलाचा फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या… नताशा हिने केलेली पोस्ट देखील तुफान चर्चेत होती.