‘हॅलो, मी बाबुराव बोलतोय…’ हे गाणं विठ्ठल उमपांकडे कसं आलं?, आधी कुणी गायलं?; वाचा, मजेदार किस्सा!

'गेली माझी सख्खी बायको गेली...' या गाण्यात गायकाला पाहिजे तसा फिल आणता आला नाही. (why manvel gaikwad gave his song to vitthal umap?)

'हॅलो, मी बाबुराव बोलतोय...' हे गाणं विठ्ठल उमपांकडे कसं आलं?, आधी कुणी गायलं?; वाचा, मजेदार किस्सा!
manvel gaikawad
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 3:30 PM

मुंबई: ‘गेली माझी सख्खी बायको गेली…’ या गाण्यात गायकाला पाहिजे तसा फिल आणता आला नाही. त्यामुळे गीतकार मानवेल गायकवाड यांनी स्वत:च हे गाणं गायलं होतं. गाणं ज्या हेतूने लिहिलं तो हेतू साध्य होईपर्यंत गायकवाड परिश्रम घेत असतात. त्यामुळे त्यांची गाणी हिट होतातच, पण कधीही ऐकली तरी ती ताजी टवटवीत वाटतात. त्यांच्या ‘हॅलो मी बाबुराव बोलतोय’ या गाण्याचा किस्साही तसाच आहे. (why manvel gaikwad gave his song to vitthal umap?)

गाण्यात फिल आला नाही म्हणून…

पोपटाचं गाणं मिलिंद शिंदेंकडून आनंद शिंदेंकडे गेलं होतं. अर्थात आनंद शिंदेंना हे गाणं आवडलं होतं. त्यांना हे गाणं गाण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी मिलिंद शिंदेंना हे गाणं गातो म्हणून सांगितलं. मिलिंद यांनीही आनंद यांना ते गाणं गाऊ दिलं. त्यामुळे ते मिलिंद यांच्याकडून आनंद यांच्याकडे आलं. पण ‘गेली माझी सख्खी बायको गेली…’ या गाण्यात सूर्यकांत शिंदे यांना हवा तसा फिल आणता येत नव्हता. गाण्यात खट्याळपणा येत नसल्याने स्वत: मानवेल गायकवाड यांच्याकडे हे गाणं गेलं. तसंच काहीसं ‘मी बाबुराव बोलतोय’ या गाण्याबाबत घडलं. हे गाणं नागेश मोर्वेकरांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं. पण मोर्वेकरांना या गाण्यात फिल आणता आला नाही. मोर्वेकर यांचा आवाज विनोदी होता. त्यामुळे त्यांच्याकडे हे गाणं देण्यात आलं होतं. पण मिक्सिंगवेळी हे गाणं गायकवाड यांना भावलं नाही. कारण ‘हॅलो’ या शब्दातला जो खट्याळपणा होता, तो गाण्यात उतरला नव्हता. त्यामुळे गायकवाड यांनी लोकशाहीर विठ्ठल उमप यांना भेटून गाणं दाखवलं. उमप यांना हे गाणं आवडलं अन् गाणं रेकॉर्डही झालं.

हॅलो… मी बाबुराव बोलतोय हॅलो… मी बाबुराव बोलतोय

काय बोलू बरं तू बोलल्यावरं जीव माझा फुलावानी फुलतोय हॅलो… मी बाबुराव बोलतोय…

मोर्वेकरांचा दिलदारपणा

विठ्ठल उमप यांच्या आवाजात हे गाणं हिट झाल्यानंतर स्वत: नागेश मोर्वेकर यांनी गायकवाड यांची भेट घेऊन उमप यांनी या गाण्याला न्याय दिल्याची मनापासून दाद दिली. तसेच हे गाणं ऐकून समाधान वाटल्याचंही सांगितलं.

सचिन पिळगावकर, प्रशांत दामलेंनीही गाणी गायली

त्यांची गाणी प्रसिद्ध कव्वाल अल्ताफ राजा यांनीही गायली आहेत. ‘लिखा है नाम भीम का’ या कॅसेटमध्ये अल्ताफ राजा यांनी त्यांचं गाणं गायलं आहे. तर ‘श्री आले बच्चन घरी’ या कॅसेटमध्ये अभिनेते सचिन पिळगावकर, प्रशांत दामले आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी त्यांची गाणी गायली आहेत. तसेच त्यांच्या संगीतात वैशाली सामंत, अरुण इंगळे, सुदेश भोसले, विठ्ठल उमप, सुषमादेवी आणि उत्तरा केळकर आदी नामवंत गायकांनी गायलं आहे.

जॉनी लिव्हर यांनी गायलं गाणं

त्यांच्या एका कॅसेटमध्ये प्रसिद्ध हास्य अभिनेता जॉनी लिव्हर आणि स्वरुप पालनकर यांनीही गाणं गायलं आहे.

राम राम पाव्हणं, मुंबईला आला की मुंबई बघून जा…

हे गाणं जॉनी लिव्हर यांनी गायलं आहे.

तर, प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनीही त्यांचं एक गाणं गायलं आहे. त्यावेळी हे गाणं अतिशय गाजलंही होतं. ते गाणं होतं…

येड्याच्या खेड्याला, अडाणी गड्याला, सांगते इथून सटका, नाही तर डिस्कोचा दावीन झटका… (साभार, आंबेडकरी कलावंत) (why manvel gaikwad gave his song to vitthal umap?)

संबंधित बातम्या:

‘गेली माझी सख्खी बायको गेली…’ या गाण्यात खट्याळपणा येत नव्हता; मग काय झालं?, वाचा!

आंटीच्या अड्डयावर रेड पडली अन् ‘आंटीची घंटी’ सूचलं; वाचा, नादावणाऱ्या गाण्याचा किस्सा

‘गानाही गाओ, नोकरी क्यों करते हो’, साहेबांच्या टोमण्यांमुळे नोकरीच सोडली; वाचा, ‘या’ गायकाचा किस्सा!

(why manvel gaikwad gave his song to vitthal umap?)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.