Rekha : पतीच्या आत्महत्येनंतर रेखा कोणाच्या नावाचं लावतात सिंदूर ; अभिनेत्रीच्या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधे खळबळ

रेखा यांच्या ओढणीनंच गळफास घेवून पतीने संपवलं जीवन ; पतीच्या निधनानंतर देखील रेखा कोणाच्या नावाचं लावतात सिंदूर? आयुष्यात अनेक चढ - उतार आले पण रेखा मात्र...

Rekha : पतीच्या आत्महत्येनंतर रेखा कोणाच्या नावाचं लावतात सिंदूर ; अभिनेत्रीच्या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधे खळबळ
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 12:43 PM

Rekha : एव्हरग्रीन सौंदर्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रेखा. आज देखील अभिनेत्री रेखा प्रचंड सुंदर दिसतात. त्यांच्या सौंदर्यापूढे बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींचं ग्लॅमर देखील फेल आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी देखील त्या प्रचंड सुंदर दिसतात. एक काळ असा होता जेव्हा रेखा यांच्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य केलं. रेखा कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता रेखा बॉलिवूडपासून दूर असल्यातरी त्यांच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगत असतात. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील रेखा तुफान चर्चेत असतात. अमिताभ आणि रेखा यांचं नातं तुटल्यानंतर अभिनेत्रीने उद्योजक मुकेश अग्रवाल (Mukesh Aggarwal) यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही… असं सांगण्यात येतं.

रेखा यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर मुकेश अग्रवाल डिप्रेशनमध्ये गेल्याचे सांगण्यात आलं. अखेर होणाऱ्या त्रासाला कंटाळून रेखा यांचे पती मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली. महत्त्वाचं म्हणजे रेखा यांच्या ओढणीनंच गळफास घेवून पतीने जीवन संपवल्याचं देखील सांगण्यात आलं. पतीच्या निधनानंतर रेखा यांना मोठा धक्का बसला होता.

रेखा यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. अनेकांनी त्यांची अर्ध्यावर साथ सोडली. पण रेखा कधीही खचल्या नाहीत. आयुष्यात दुःख आल्यानंतर त्या तेवढ्याच ताकदीने पुन्हा उभ्या राहिल्या. रेखा यांना अनेक गोष्टींचा सामना कराला लागला. अनेकांनी त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केलं. अशाच प्रश्नांपैकी एक म्हणजे पतीच्या निधनानंतर रेखा कोणाच्या नावाचं सिंदूर लावतात?

हे सुद्धा वाचा

रंगणाऱ्या सर्व चर्चांचं उत्तर देत रेखा यांनी अनेक गोष्टींना पूर्णविराम दिला. रेखा म्हणाल्या, ‘मी कोणाच्याही नावाचं सिंदूर लावत नाही. मी माझ्या फॅशनसाठी सिंदूर लावते. माझ्या मेकअपवर सिंदूर लावल्यामुळे माझं सौंदर्य आणखी फुलून दिसतं. म्हणून मी सिंदूर लावते….’ असा खुलासा रेखा यांनी केला होता.

रेखा जेव्हा अभिनेत्री नितू कपूर आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या लग्नात हजेरी लावली होती, तेव्हा देखील त्यांनी सिंदूर लावलं होतं. ज्यामुळे तुफान चर्चा रंगली. पण रेखा यांनी फक्त स्वतःच्या मनाचं ऐकलं आणि स्वतःला चांगलं वाटलं ते केलं. आज रेखा यांचं नाव प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे.

रेखा यांच्या आयुष्यात अनेक सेलिब्रिटी आले, पण कोणासोबत नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. त्यानंतर रेखा यांनी १९९० मध्ये उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण मुकेश आणि रेखा यांचं नातं फक्त तीन महिने टिकलं. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर मुकेश आणि रेखा यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मुकेश यांनी गळफास घेत स्वतःचं जीवन संपवलं. आता रेखा सर्वकाही असूनही एकट्या आयुष्य जगत आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.