शतक महोत्सवी विभागीय नाट्यसंमेलनाला अमिताभ बच्चन येणार? चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

सोलापुरात शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचा शुभारंग करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. या संमेलनाला बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

शतक महोत्सवी विभागीय नाट्यसंमेलनाला अमिताभ बच्चन येणार? चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
अमिताभ बच्चन
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 1:05 PM

सोलापूर : 28 डिसेंबर 2023 | सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे विभागीय नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. नवीन वर्षात 26, 27 आणि 28 जानेवारीला सोलापुरात विभागीय नाट्यसंमेलन पार पडणार आहे. कार्यालयाच्या शुभारंभावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासोबत यावेळी नाट्य आणि सिनेअभिनेते भाऊ कदमदेखील उपस्थित होता. मंचावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरातील विभागीय नाट्य संमेलनाला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन येण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलंय.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“भाऊ कदम यांची एण्ट्री झाली की सगळेच खळखळून हसतो. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ताणतणाव असतात. मात्र भाऊ कदम यांची एण्ट्री झाली की हा ताणतणाव कमी होतो. पुण्यातील नॅशनल बुक ट्रस्टच्या संमेलनात 11 कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली आहे. त्याप्रमाणे सोलापुरातील विभागीय नाट्य संमेलनाचेही रेकॉर्ड झाले पाहिजेत. दर आठवड्याला सोलापूरला येण्याचं मी कबूल केलं आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व निधी मंजूर झाला पाहिजे यासाठी मी काम करतोय. नियोजन समितीतून भरीव निधी नाट्य संमेलनाला देऊ. मी अडीच लाख स्वतःच्या खिशातून दिले आहेत. तुम्हीही भरीव मदत करा. त्याचप्रमाणे नाट्य संमेलनाला अमिताभ बच्चन यांना घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. आशिष शेलार यांच्याशी बोलतो आणि अमिताभ बच्चन यांना सोलापूरला घेऊन येण्यासाठी सांगतो,” असं ते म्हणाले.

सोलापूर शहरातील नॉर्थकोट मैदानावर जानेवारी महिन्यात 26, 27 आणि 28 या तारखांना विभागीय नाट्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. यंदा नाट्य संमेलनाचं शंभरावं वर्ष असल्याने विभागीय पद्धतीने ते पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल असणार आहेत. सोलापूरशिवाय अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई या ठिकाणीही विभागीय नाट्य संमेलनं संपन्न होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

या नाट्य संमेलनाचा महत्वाचा भाग महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव दिनांक 15 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असं आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केलं आहे. ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध 22 केंद्रांवर रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, ठाणे, नवीमुंबई , मुंबई येथे होणार आहे. यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा प्राथमिक, उपांत्य व अंतिम फेरी अश्या तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.