Will Smith In Mumbai : ऑस्कर पुरस्कारामध्ये कानाखाली लगावल्यानंतर विल स्मिथ मुंबई विमातळावर दिसला, सोबत असलेले हे साधू नेमके कोण?

ऑस्कर 2022 नंतर विल स्मिथ (Will Smith) जगभरामध्ये चर्चेत आला. विशेष म्हणजे आज मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) विल स्मिथला पाहिले गेले आहे. यावेळी विल स्मिथसोबत भगवे कपडे घातलेले एक साधू देखील दिसले. यावरून एक अंदाजा बांधला जात आहे की, तो भारतामध्ये (India) कुठल्यातरी धार्मिक कार्यक्रमासाठी आला होता.

Will Smith In Mumbai : ऑस्कर पुरस्कारामध्ये कानाखाली लगावल्यानंतर विल स्मिथ मुंबई विमातळावर दिसला, सोबत असलेले हे साधू नेमके कोण?
विल स्मिथ मुंबई विमातळावरील फोटो व्हायरल. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 3:18 PM

मुंबई : ऑस्कर 2022 नंतर विल स्मिथ (Will Smith) जगभरामध्ये चर्चेत आला. कारण यंदा ऑस्कर पुरस्कारपेक्षाही विल स्मिथने लगावलेली कानाखाली चर्चेत होती. विशेष म्हणजे आज मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) विल स्मिथला पाहिले गेले आहे. यावेळी विल स्मिथसोबत भगवे कपडे घातलेले एक साधू देखील दिसले. यावरून एक अंदाजा बांधला जात आहे की, तो भारतामध्ये (India) कुठल्यातरी धार्मिक कार्यक्रमासाठी आला होता. मात्र, विल स्मिथ नेमक्या कोणत्या कार्यक्रमासाठी आणि कुठल्या शहरामध्ये आला होता, याबद्दल माहिती मिळू शकली नाहीये. विल स्मिथ या अगोदरही भारतामध्ये आला होता.

विल स्मिथचे हरिद्वारसोबत खास नाते

विल स्मिथचे भारताशी खास नाते आहे. हरिद्वारशी त्यांचा जवळचा संबंध आहे. विल स्मिथ यापूर्वी 2018 मध्ये भारतात आला होता. त्यानंतर तो हरिद्वारला गेला होता. त्यावेळी त्यांनी भगवान शंकराचा रुद्राभिषेक केला. तेथे त्यांनी गंगा आरती देखील केली होती. विल स्मिथची हिंदू धर्मावर श्रद्धा आहे. स्मिथने आपले भविष्य देखील जाणून घेतले होते. शिवाय जन्मपत्रिकाही बनवली होती. इतकंच नाही तर विल स्मिथ देखील ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांना भेटायला आला होता. या भेटीचे फोटोही त्यावेळी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

इथे पाहा विल स्मिथचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ

मुंबई विमानतळावरील फोटो व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो सद्गुरु जग्गी वासुदेव महाराज यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली आहेत. 94 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात हॉलिवूड अभिनेत्याने द रॉकला कानाखाली लगावली होती आणि त्यानंतर विल स्मिथच्या अडचणी वाढल्या आहेत. तेव्हापासून स्मिथला सर्व बाजूंनी त्रास सहन करावा लागला आहे. विल स्मिथ यांचा अडचणी वाढत असताना तो भारतामध्ये आला आणि नेमके स्मिथचे भारतामध्ये येण्याचे कारण नेमके काय? यावर आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

संबंधित बातम्या :  Sidharth-Kiara Breakup | सिद्धार्थ-कियारा यांच्या ब्रेकअपच्या चर्चा, चाहत्यांना मोठा धक्का…

Alia-Ranbir : बाब्बोव, रणबीरनं जेवढे पैसे बुटासाठी ‘करवल्यांना’ दिले तेवढ्यात श्रीमंतांचं लग्न लागेल, बघा नेमका आकडा !

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.