AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT 2025: कमी कालावधीत मिळालेल्या प्रसिद्धी आणि यशाबद्दल विजय देवरकोंडा म्हणाला…

WITT 2025: ‘टीव्ही 9’चा वार्षिक कार्यक्रम ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिट 2025 ची रंगतदार सुरुवात झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकास आणि योजनांबद्दल चर्चा केली. याशिवाय दक्षिणेतील अभिनेता विजय देवरकोंडानेही ‘WITT 2025’मध्ये भाग घेतला. अभिनेत्याने यावेळी त्याला मिळालेल्या प्रसिद्धी आणि यशाबद्दल मोठं वक्तव्य केलं.

WITT 2025: कमी कालावधीत मिळालेल्या प्रसिद्धी आणि यशाबद्दल विजय देवरकोंडा म्हणाला...
| Updated on: Mar 29, 2025 | 10:15 AM
Share

‘टीव्ही 9’चा वार्षिक कार्यक्रम ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिट 2025 ची जोरदार सुरुवात झाली. या दोन दिवसीय ग्लोबस समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. व्हॉट इंडिया थिंक्स टुडेमध्ये सहभागी होण्यासाठी राजकारण, कला आणि व्यवसाय क्षेत्रातील लोक दिल्लीतील भारत मंडपममध्ये पोहोचले. यावेळी कलाविश्वाशी निगडित प्रसिद्ध कलाकारांनीही समिटमध्ये सहभाग घेतला. दक्षिण सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा देखील कार्यक्रमात सहभागी होता. साऊथ सिनेमांचा वाढता दबदबा आणि त्याच्या वाढत्या फॅन फॉलोइंगबद्दलही अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

एवढ्या कमी कालावधीत प्रसिद्धी आणि यश कसं मिळवलं? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर अभिनेता म्हणाला, ‘अनेक गोष्टी एकाच वेळी एकत्र आल्यानंतर सर्वकाही घडून येतं. सर्वात पहिली गोष्ट तर, माझ्यावर अनेकांचे असलेले आशीर्वाद… दुसरी गोष्ट म्हणजे मी जे कोणतं काम हाती घेतो, ते काम मी मन लावून करतो. ते काम पूर्ण होईपर्यंत मी शांत बसत नाही.’

‘त्यानंतर या प्रवासात मला अनेक उत्तम दिग्दर्शकांची साथ मिळाली. ज्यांनी मझ्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामधील काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर हीट देखील ठरल्या. हेच कारण आहे, ज्यामुळे मी प्रेक्षकांच्या संपर्कात राहिलो…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

‘या’ दिग्दर्शकांनी विजयला मिळाली साथ…

विजय देवरकोंडा पुढे म्हणाला, ‘संदीप रेड्डी आणि नाग अश्विन या दिग्दर्शकांनी माझ्यासोबत पहिले सिनेमे केले आणि हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले. ज्यामुळे माझ्या यशामागे दिग्दर्शकांचं देखील मोठं योगदान आहे. मला असं वाटतं की हे स्टारडम केवळ माझ्या मेहनतीचे फळ नाही तर 3-4 गोष्टी एकत्र आल्यावर हे घडतं. आत्तापर्यंत केलेल्या कामानुसार जास्त प्रेम मिळाल्याचं देखील अभनेता म्हणाला. सध्या सर्वत्र विजय देवरकोंडा यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.