Saiyaan Ji Video Song | हनी सिंगचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

बॉलिवूड गायक यो यो हनी सिंहचे ( Yo Yo Honey Singh) नवीन गाणे सईयां जी रिलीज झाले आहे.

Saiyaan Ji Video Song | हनी सिंगचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 5:11 PM

मुंबई : बॉलिवूड गायक यो यो हनी सिंहचे ( Yo Yo Honey Singh) नवीन गाणे सईयां जी रिलीज झाले आहे. या गाण्यात हनी सिंगसोबत नुसरत भरुचा एका वेगळ्या अंदाजाच दिसत आहे. सईयां जी गाण्यात नुसरत हनी सिंहसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हे गाणे रिलीज होताच युट्यूबवर व्हायरल झाले आहे. हे गाणं रिलीज झाल्याबरोबरच लाखो लोकांनी हे गाणे बघितले आहे. सईयां जी हे गाणे यो यो हनी सिंह आणि नेहा कक्कड़ यांनी गायले आहे. या गाण्याचे बोल हनी सिंह, लिल गोलू आणि होमी दिल्लीवाला यांनी लिहिले आहेत. या गाण्यात नुसरत भरुचा हॉट अंदाजात दिसत आहे.( Yo Yo Honey Singh’s new song release)

हनी सिंह आणि नुसरतची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. अलीकडे हनी सिंहचे गाणे फर्स्ट किस रिलीज झाले होते. रिलीजच्या काही तासांतच या गाण्याला 4 लाखांहून अधिक लोकांना पाहिले होते. द कपिल शर्मा शो’मध्ये राजकुमार राव आणि नुसरत भरुचा काही दिवसांपूर्वी सहभागी झाले होते. दोघेही त्यांच्या ‘छलांग’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आले होते.

कपिल शर्माने राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमचे स्वागत केले होते. यावेळी कपिल नुसरतबरोबर फ्लर्ट करताना दिसला होता. या भागामध्ये सर्वात मजेदार म्हणजे राजकुमार भारतीला उचलून डान्स करत होता. ‘छलांग’ या चित्रपटात सतीश कौशिक, झीशान अयूब यांच्यासह अनेक कलाकार राजकुमार आणि नुसरतसोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले होते. ‘छलांग’ चित्रपटाचे दिग्दर्शन हंसत मेहता यांनी केले आहे.

संबंधित बातम्या : 

नेपोटीझमच्या टीकेची भीती, बॉलिवूड एंट्रीपूर्वीच खुशी कपूर ‘अभिनय शाळेत’ दाखल!

Thank you Note | वरुण-नताशाचा थाटात लग्नसोहळा, लग्नानंतर फॅन्ससाठी खास मेसेज शेअर!

कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, कंगना म्हणते ‘मोदीजी कायदे त्वरित लागू करा…!’

( Yo Yo Honey Singh’s new song release)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.