युट्यूबर अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीने सवतच्या बाळासोबत केलं असं काही, व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

अरमान हा हैदराबादमधील प्रसिद्ध युट्यूबर आहे. सोशल मीडियावर त्याचे पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तो नेटकऱ्यांचं मनोरंजन करतो. 2011 मध्ये त्याने पायलशी लग्न केलं. या दोघांना चिरायू हा मुलगा आहे.

युट्यूबर अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीने सवतच्या बाळासोबत केलं असं काही, व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Kritika MalikImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 11:50 AM

मुंबई : युट्यूबर अरमान मलिक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच अरमानच्या दोन्ही पत्नींची डिलिव्हरी झाली. पायलने जुळ्या मुलांना जन्म दिला तर कृतिका एका मुलाची आई झाली. गरोदरपणापासून ते बाळंतपणापर्यंतचा हा प्रवास त्यांनी युट्यूब व्हिडीओद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला. या तिघांचे वेगवेगळे युट्यूब चॅनल असून त्यांचे बरेच फॉलोअर्स आहेत. अरमानची दुसरी पत्नी कृतिकाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या सावत्र मुलीला मेकअप करताना दिसतेय. यामुळे नेटकरी तिच्यावर भडकले आहेत.

कृतिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. यामध्ये कृतिका ही पायलच्या चिमुकल्या मुलीला फोटोशूटसाठी तयार करताना दिसतेय. यावेळी ती बाळाच्या चेहऱ्यावर मेकअप लावते. इतक्या चिमुकल्या बाळाला मेकअप लावणं योग्य नसल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर राग व्यक्त केला आहे. लहान मुलांची त्वचा फार संवेदनशील असते, त्यामुळे त्यांच्यावर मेकअपचे प्रॉडक्ट वापरू नयेत, असा सल्ला अनेकांनी तिला दिला आहे.

हे सुद्धा वाचा

अरमान हा हैदराबादमधील प्रसिद्ध युट्यूबर आहे. सोशल मीडियावर त्याचे पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तो नेटकऱ्यांचं मनोरंजन करतो. 2011 मध्ये त्याने पायलशी लग्न केलं. या दोघांना चिरायू हा मुलगा आहे. त्यानंतर 2018 मध्ये त्याने कृतिकाशी लग्न केलं. कृतिका ही पायलची खास मैत्रीण असल्याचंही म्हटलं जातं. दुसरं लग्न झाल्यानंतरही हे चौघं एकाच घरात एकत्र राहत आहेत. पायल आणि कृतिका यांचे अनेकदा एकत्र फोटो पहायला मिळतात.

पहा व्हिडीओ

पत्नी आणि मुलांशिवाय अरमान मलिकची स्वत:ची एक मोठी टीम आहे. या टीमपैकी काही जण व्हिडीओ बनवण्याचं आणि काही जण व्हिडीओ एडिट करण्याचं काम करतात. याशिवाय दररोज नवीन कंटेट तयार करण्याची जबाबदारी अरमानची असते. लोकांचं लक्ष वेधण्यासाठी तो अनेकदा त्याच्या दोन्ही पत्नींमधील भांडण दाखवतो. या दोघींमधील भांडणाच्या व्हिडीओला तुफान व्ह्यूज मिळतात.

एका रिपोर्टनुसार युट्यूबर अरमान मलिक 10 ते 15 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. याशिवाय तो दर महिन्याला तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करतो. ही कमाई फक्त अरमानच्या युट्यूब चॅनलची आहे. त्याच्या पत्नींच्या युट्यूब पेजेसवरूनही चांगली कमाई होते. त्यामुळे युट्यूबच त्यांच्या कमाईचा मुख्य स्रोत आहे. युट्यूबशिवाय तो इतर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरूनही पैसे कमावतो.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.