Armaan Malik | ‘एकाच घरात दोन पत्नींसोबत राहणं सोपं नाही भावा’; प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नींमध्ये कडाक्याचं भांडण

अरमान हा हैदराबादमधील प्रसिद्ध युट्यूबर आहे. सोशल मीडियावर त्याचे पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तो नेटकऱ्यांचं मनोरंजन करतो. 2011 मध्ये त्याने पायलशी लग्न केलं. या दोघांना चिरायू हा मुलगा आहे.

Armaan Malik | 'एकाच घरात दोन पत्नींसोबत राहणं सोपं नाही भावा'; प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नींमध्ये कडाक्याचं भांडण
Payal and Kritika MalikImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 2:58 PM

हैदराबाद : युट्यूबर अरमान मलिक नेहमीच त्याच्या दोन्ही पत्नींसोबतचे नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. युट्यूबपासून इन्स्टाग्रामपर्यंत मलिक कुटुंबीय त्यांचे व्हिडीओ पोस्ट करत असतात. पायल आणि कृतिका या अरमानच्या दोन पत्नी असून या दोघी एकत्र एकाच घरात राहतात. या दोघी एकत्रच गरोदर झाल्या होत्या आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी बाळाला जन्म दिला. त्यानंतर आता पुन्हा एकदा पायल आणि कृतिका एकमेकींसोबत भांडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पायलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

यामध्ये कृतिका आरशात पाहून लिपस्टिक लावत असते. तेव्हाच पायल तिथे येऊन तिला धक्का मारते. धक्का लागल्याने कृतिकाच्या चेहऱ्यावर इथे-तिथे लिपस्टिक लागते. मेकअप खराब झाल्याने ती खूप चिडते आणि तितक्यात पायल तिथून पळ काढते. कृतिका तिचा पाठलाग करत असते. या व्हिडीओत पायल तिच्या बाल्कनीपर्यंत जाते आणि तिथून अचानक गायब होते. जेव्हा कृतिका बाल्कनीजवळ पोहोचते, तेव्हा तिला पायल दिसत नाही. अरमान मलिकसोबतच पायल आणि कृतिकालाही अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात कसा राहू शकतो, असा सवाल अनेकदा नेटकरी विचारतात.

हे सुद्धा वाचा

कोण आहे अरमान मलिक?

अरमान हा हैदराबादमधील प्रसिद्ध युट्यूबर आहे. सोशल मीडियावर त्याचे पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तो नेटकऱ्यांचं मनोरंजन करतो. 2011 मध्ये त्याने पायलशी लग्न केलं. या दोघांना चिरायू हा मुलगा आहे. त्यानंतर 2018 मध्ये त्याने कृतिकाशी लग्न केलं. कृतिका ही पायलची खास मैत्रीण असल्याचंही म्हटलं जातं. दुसरं लग्न झाल्यानंतरही हे चौघं एकाच घरात एकत्र राहत आहेत. पायल आणि कृतिका यांचे अनेकदा एकत्र फोटो पहायला मिळतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.