Armaan Malik याच्यानंतर आणखी एका YouTuber ने केलं सर्वांना हैराण; कॅमेऱ्यासमोर दोन पत्नींसोबत…

अरमान मलिक याच्यानंतर 'या' YouTuber ची आणि त्याच्या दोन पत्नींची सोशल मीडियावर तुफान चर्चा; त्याचा दोन पत्नींसोबत व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

Armaan Malik याच्यानंतर आणखी एका YouTuber ने केलं सर्वांना हैराण; कॅमेऱ्यासमोर दोन पत्नींसोबत...
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 9:48 AM

मुंबई : प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) याच्यानंतर आणखी एका यूट्यूबरची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. अरमान मलिक प्रमाणे या यूट्यूबरला देखील दोन पत्नी आहेत. या यूट्यूबरचं नाव सनी राजपूत असं आहे. सनी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आला आहे. अरमान प्रमाणेच सनीचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आसतात. सनीच्या दोन पत्नींची नावे रूप राजपूत आणि मानसी राजपूत अशी आहेत. सनी त्याच्या दोन पत्नींसोबत अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन पत्नीसोबत व्हिडीओ पोस्ट करत असतो. ज्यामुळे सनीला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र सनी आणि त्याच्या दोन पत्नीची चर्चा आहे.

सनी राजपूत प्रचंड प्रसिद्ध आहे. सनी आणि त्यांचं कुटुंब YouTube चॅनलवर कायम सक्रिय असतं. YouTube वर राजपूत कुटुंबाचे जवळपास 227,000 सब्सक्रायबर्स आहेत. सनीची पत्नी रुप आणि मानसी यांचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेटत. सनी राजपूत याचं एक YouTube चॅनल आहे. ज्याचं नाव @SunnyRajput असून जवळपास 5,000 सब्सक्रायबर्स आहेत.

या चॅनलवर तो त्याच्या रोजच्या दिनचर्येपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंतचे स्वतःचे आणि त्याच्या कुटुंबाचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. सनी राजपूतच्या दैनंदिन जीवनातील व्हिडीओजचे इंटरनेटवर सध्या खूप कौतुक होत आहे. अरमान मलिक याच्यानंतर सनी आणि त्याच्या कुटुंबाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलेली असते.

अरमान मलिक देखील त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. युट्यूबर अरमान मलिक याला देखील दोन पत्नी आहेत. अरमान कायम त्याच्या दोन पत्नींसोबत पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असतो. अरमानच्या दोन पत्नींचा नावे कृतिका आणि पायल अशी आहेत.

कृतिकाने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. कृतिका आई झाल्याचं कळताच फॉलोअर्सकडून अरमान आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अरमानच्या दोन्ही पत्नींनी जेव्हा गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं, तेव्हा सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा झाली होती. या दोघांसोबतचे फोटोसुद्धा त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आता कृतिकानंतर पायलसुद्धा लवकरच जुळ्या बाळांना जन्म देणार आहे.

अरमान त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. अरमानचं खरं नाव संदीप असं आहे. त्याने जेव्हा आपल्या दोन लग्नांविषयी युट्यूबवर सांगितलं, तेव्हापासून तो रातोरात प्रकाशझोतात आला.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.