श्रेयस अय्यर – धनश्रीच्या खिडकीबाहेरील दृश्य ठरलं गॉसिपचा विषय; नेटकरी म्हणाले ‘युजवेंद्रला फसवलं..’

याआधीही धनश्रीचं नाव श्रेयस अय्यरशी जोडलं गेलं होतं. धनश्रीने तिच्या नावातून चहल हे आडनाव हटवल्यानंतर तेव्हासुद्धा ती श्रेयसला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यावेळी या चर्चा केवळ अफवा असल्याचं चहलने स्पष्ट केलं होतं.

श्रेयस अय्यर - धनश्रीच्या खिडकीबाहेरील दृश्य ठरलं गॉसिपचा विषय; नेटकरी म्हणाले 'युजवेंद्रला फसवलं..'
Dhanashree and Shreyas IyerImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 3:27 PM

बेंगळुरू : क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री सोशल मीडियावर खूर सक्रिय असते. धनश्रीचा इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर मोठा चाहतावर्ग आहे. नुकताच तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोची सध्या नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा होत आहे. यामागचं कारण म्हणजे क्रिकेटर श्रेयस अय्यर. नेटकरी या दोघांच्या फोटोंमधील कनेक्शन शोधून त्यांना ट्रोल करत आहेत. धनश्रीने तिच्या बाल्कनीतून पावसाचा फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोमध्ये समोर एक बिल्डिंग आणि पाऊस पडताना दिसत आहे. याच फोटोचं कनेक्शन नेटकऱ्यांनी श्रेयस अय्यरने पोस्ट केलेल्या फोटोशी लावला आहे.

श्रेयस अय्यरनेही त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमधील दृश्य धनश्रीने पोस्ट केलेल्या फोटोमधील दृश्यासारखंच दिसत आहे. तशीच इमारत या फोटोमध्ये पहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी हे दोन्ही फोटो एकत्र करून धनश्री आणि श्रेयसला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हे दोघं एकमेकांना कॉपी करत आहेत, असं एकाने लिहिलं. तर धनश्री युजवेंद्रला फसवतेय, असं थेट दुसऱ्या युजरने म्हटलंय. इतकंच नव्हे तर धनश्री आमि श्रेयस हे हॉटेलच्या एकाच रुममध्ये असल्याची टिप्पणीही नेटकऱ्याने केली आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे फोटोमागील सत्य?

धनश्री आणि श्रेयसने पोस्ट केलेले फोटो जरी एकसारखेच दिसत असले तरी या दोन्ही फोटोंमध्ये बराच फरक आहे. हे दोन्ही फोटो वेगवेगळ्या बाल्कनीचे आहेत. याचा पुरावा म्हणजे बाल्कनीची ग्रिल. धनश्री आणि श्रेयसने पोस्ट केलेल्या फोटोतील बाल्कनीचा ग्रिल वेगवेगळ्या आकाराचा आहे. हे दोघं एकाच ठिकाणी असण्यामागचं कारणसुद्धा समोर आलं आहे. श्रेयस अय्यर हा गेल्या काही दिवसांपासून बेंगळुरूतील एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत आहे. युजवेंद्र चहलसुद्धा एनसीएमध्ये थांबला आहे. सर्व खेळाडू एकाच ठिकाणी थांबले आहेत. युजवेंद्रसोबत त्याची पत्नी धनश्रीसुद्धा बेंगळुरूमध्येच आहे.

याआधीही धनश्रीचं नाव श्रेयस अय्यरशी जोडलं गेलं होतं. धनश्रीने तिच्या नावातून चहल हे आडनाव हटवल्यानंतर तेव्हासुद्धा ती श्रेयसला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यावेळी या चर्चा केवळ अफवा असल्याचं चहलने स्पष्ट केलं होतं. मध्यंतरी या दोघांचा डान्ससुद्धा व्हायरल झाला होता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.