AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांची एक चूक अन् झीनत अमान यांना ऐकावं लागलं बरंवाईट; अभिनेत्रीला कोसळलं रडू

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री झीनत अमान यांनी लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका चित्रपटाच्या सेटवरील किस्सा सांगितला. शूटिंगदरम्यान बिग बींच्या एका चुकीची शिक्षा झीनत अमान यांना मिळाली होती.

अमिताभ बच्चन यांची एक चूक अन् झीनत अमान यांना ऐकावं लागलं बरंवाईट; अभिनेत्रीला कोसळलं रडू
Zeenat Aman and Amitabh BachchanImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 13, 2023 | 3:30 PM
Share

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : सत्तर-ऐशीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. यामध्ये ‘लावारिस’, ‘महान’, ‘दोस्ताना’, ‘महान’ आणि ‘पुकार’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांमधील झीनत अमान आणि बिग बींच्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली होती. सेटवरील बिग बींचे काही नियम असतात, हे सर्वंच कलाकारांना माहीत आहे. शूटिंगला वेळेवर पोहोचणं, विलंब न करणं, सहकलाकारांसोबत नम्रतेने वागणं यासाठी ते ओळखले जातात. अशातच आता झीनत अमान यांनी एक रंजक किस्सा सांगितला आहे.

झीनत अमान यांनी अमिताभ बच्चन यांच्या सेटवर उशिरा पोहोचण्याचा हा किस्सा सांगितला. यामुळे त्यांना बरंवाईट ऐकावं लागलं होतं आणि सेटवरच त्यांना रडू कोसळलं होतं. अमिताभ बच्चन यांनी नुकताच त्यांचा 81 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र झीनत अमान यांनी शुभेच्छा देण्यात विलंब केला. वाढदिवसाच्या उशिरा शुभेच्छा देत त्यांनी इन्स्टाग्रामवर हा किस्सा सांगितला.

View this post on Instagram

A post shared by Zeenat Aman (@thezeenataman)

झीनत अमान यांनी किस्सा सांगताना हे स्पष्ट केलं की ते चित्रपटाचं, दिग्दर्शकाचं किंवा घडलेल्या घटनेचं वर्ष सांगणार नाहीत. बिग बी त्यांच्या शूटिंगला कधीच उशिरा येत नाहीत. मात्र एके दिवशी सकाळच्या शिफ्टला ते उशिरा पोहोचले होते. त्यादिवशी झीनत अमान शूटिंगला वेळेवर पोहोचल्या होत्या. जवळपास 45 मिनिटांनंतर झीनत अमान यांना सांगितलं गेलं की बिग बी सेटवर पोहोचले आहेत. तेव्हा त्या मेकअप रुममधून सेटवर पोहोचल्या. हे पाहून दिग्दर्शकांना वाटलं होतं की झीनत अमान यांच्यामुळे शूटिंगला विलंब झाला. त्यामुळे ते मागचा पुढचा विचार न करताच अभिनेत्रीवर भडकले. दिग्दर्शकांचा ओरडा ऐकल्यानंतर झीनत अमान यांना रडूच कोसळलं होतं. एकही शब्द न बोलता त्या सेटवरून निघून गेल्या.

या घटनेविषयी जेव्हा बिग बींना समजलं, तेव्हा त्यांनी झीनत अमान यांची माफी मागितली. बिग बींनी स्वत:ची चूक मान्य केली. यानंतर निर्मात्यांना घेऊन ते झीनत अमान यांच्याकडे गेले आणि त्यांना पुन्हा शूटिंगला येण्याची विनंती केली. या घटनेनंतर झीनत अमान यांनी कसंबसं त्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. मात्र त्यानंतर भविष्यात दोघांनी एकत्र काम केलं नाही. घटनेची पूर्वकल्पना नसताना संपूर्ण टीमसमोर दिग्दर्शकांनी केलेला अवमान त्यांना अजिबात आवडला नव्हता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.