Corona Update : केरळमध्ये 247 तर महाराष्ट्रात 171 नवे कोरोनाग्रस्त; केंद्राच्या सतर्कतेच्या सूचना

महाराष्ट्रात नवीन 171 रुग्णांची भर पडल्यानंतर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 78,72,203 झाली आहे. काही राज्यांत कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दैनंदिन आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना संपला असा समज करून बेफिकीर वागता कामा नये, असा सतर्कतेचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

Corona Update : केरळमध्ये 247 तर महाराष्ट्रात 171 नवे कोरोनाग्रस्त; केंद्राच्या सतर्कतेच्या सूचना
कोल्हापूरात कोरोनाचे रुग्ण Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 1:45 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्ये (Corona Patients)त घट होत चालली आहे. मात्र याचवेळी काही राज्यांमध्ये अजूनही सतर्कता बाळगण्याची गरज आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सावध केली आहे. आरोग्य मंत्रालया (Health Ministry)ने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत केरळमध्ये कोरोनाचे 847 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे येथील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 65,25,879 झाली आहे. याशिवाय महाराष्ट्रात 171 आणि आंध्र प्रदेशात 75 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात नवीन 171 रुग्णांची भर पडल्यानंतर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 78,72,203 झाली आहे. काही राज्यांत कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दैनंदिन आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना संपला असा समज करून बेफिकीर वागता कामा नये, असा सतर्कतेचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. (247 new corona patients in Kerala and 171 in Maharashtra, Centre’s vigilance notice)

केरळमध्ये कोरोनामुळे 59 रुग्णांचा मृत्यू

केरळच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोनामुळे आणाखी 59 रुग्णांचा मृत्य झाला. परिणामी, केरळातील एकूणा कोरोनाबळींची संख्या 67,197 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या संशयावरून 22,683 नमुने तपासण्यात आले. सध्या राज्यात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 6,464 आहे. शुक्रवारी दिवसभरात एकूण 1,321 लोकांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यभरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 64,51,349 वर गेली आहे.

महाराष्ट्रात दिलासा; 24 तासांत केवळ 3 कोरोनाबळींची नोंद

राज्याचा मृत्यूदर नियंत्रणात आल्यामुळे महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनामुळे आणखी तीन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींचा एकूण आकडा 1,43,765 वर गेला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,680 आहे. शुक्रवारी 394 लोक कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या 77,22,754 वर पोहोचली आहे.

आंध्र प्रदेशमध्ये 75 नवीन रुग्ण

शुक्रवारी आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 75 नवीन रुग्ण आढळल्यानंतर एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 23,19,141 वर गेली आहे. ताज्या बुलेटिननुसार, कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 536 आहे, तर शुक्रवारी 46 लोकांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त लोकांची संख्या 23,03,875 वर गेली आहे. (247 new corona patients in Kerala and 171 in Maharashtra, Centre’s vigilance notice)

इतर बातम्या

धक्कादायक ! बिहारमध्ये प्रेयसीला मनवण्यासाठी केलेले आत्महत्येचे नाटक बेतले जीवावर

Gujrat Drowned Death : गुजरात विविध घटनेत 11 जणांचा बुडून मृत्यू, अंघोळीसाठी गेले असता घडली घटना

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.