After Delivery | गरोदरपणानंतर केस गळतीनं हैराण? या 5 गोष्टींनी नक्कीच दिलासा मिळेल!

गरोदरपणाच्या काळामध्ये महिलांचे केस घनदाट आणि लांबसडक होतात परंतु डिलिव्हरी झाल्यानंतर महिलांना केस गळण्याची समस्या उद्भवू लागते. या काळादरम्यान काही महिलांचे केस खूपच गळू लागतात. एक गोष्ट तुम्हाला माहितीच असेल कि जर आपण आपल्या आहारामध्ये उचित पोषक तत्त्वांचा व पौष्टिक पदार्थांचा समावेश केला तर आपल्या गळणार्‍या केसांना आपण थांबवू शकतो तसेच भविष्यात केस पुन्हा गळू नये यासाठी काही घरगुती उपाय सुद्धा करू शकतो.

After Delivery | गरोदरपणानंतर केस गळतीनं हैराण? या 5 गोष्टींनी नक्कीच दिलासा मिळेल!
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 9:38 PM

गरोदरपणाचा काळ हा अतिशय मजेशीर असतो परंतु या प्रवासामध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल होत असतात. गरोदरपणात नाही तर डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा महिलांच्या शरीरावर अनेक वेगवेगळे परिणाम झालेले आपल्याला पाहायला मिळतात. डिलीवरी झाल्यानंतर अनेक महिलांना केस गळतीची समस्या त्रास देऊ लागते. अमेरिकन प्रेग्नेंसी असोशियन यांच्या आकडेवारीनुसार 40 ते 50 टक्के महिलांना डिलिव्हरी झाल्यानंतर केसांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. डिलिव्हरी झाल्यानंतर केस गळणे तसे पाहायला गेले तर साधारण बाब आहे तरी गरोदरपणाच्या दरम्यान एस्‍ट्रोजन आणि प्रोजेस्‍टेरोन वाढल्यामुळे केस आणि नखांची वाढ होते जेव्हा गरोदरपणाच्या नंतर या हार्मोनच्या संख्येत कमतरता निर्माण होते तेव्हा केसांची वाढ ही 77% कमी होऊन जाते आणि परिणामी आपल्याला केस गळतीची समस्या उद्भवू लागते.

असे म्हटले जाते की ब्रेस्‍टफीडिंग कारणामुळे सुद्धा केस गळू शकतात, खरेतर या माहितीची दावा करू शकेल असे अजून कोणतेही तथ्ये सापडले नाही.ऑस्‍ट्रेलियन ब्रेस्‍ट फीडिंग एसोसि‍एशन आणि कॅनेडियन ब्रेस्‍टफीडिंग फाउंडेशन यांनी तर दावा केला आहे की स्तनपान केल्यामुळे केस गळती होत नाही.

या सगळ्या कारणा व्यतिरिक्त आपण आपल्या आहारामध्ये काही विशेष पदार्थांचा समावेश जर केला तर आपण गळणार्‍या केसांपासून आपली सुटका होऊ शकते तसेच आपले केसांचे मूळ सुद्धा मजबूत बनवू शकतो. आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी असे काही पदार्थ सांगणार आहोत जे तुमच्या केस गळतीच्या समस्येला रोखणार आहेत.

प्रोटीन वाले पदार्थ

केस मजबूत आणि लांब सडक बनवण्यासाठी बायोटीन गरजेचे आहे. आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता निर्माण झाली तर केस गळू लागतात. लिव्हर, अंड्याचा बलक, सुकामेवा आणि दूध, दही अवाकाडो ,सफरचंद या सर्व पदार्थांपासून आपल्याला बायोटीन प्राप्त होते आणि या पदार्थांच्या सेवनाने आपल्याशी केसांची गळती सुद्धा थांबते.

विटामिन ए असणारे पदार्थ

डोळ्यांची नजर तेज बनवण्यासाठी, दात, स्केलेटल टिशू आणि त्वचेच्या आरोग्यासाठी विटामिन ए खूपच लाभदायक ठरते. विटामिन ए मुळे आपल्या शरीराला खूप सारे पोषक तत्व सुद्धा प्राप्त होतात विटामिन ए च्या साह्याने आपली त्वचा मुलायम आणि कोमल बनते तसेच आपल्या स्कल्पवरील जे नव्याने येणारे केस आहेत ते सुद्धा मजबूत बनतात. आपल्याला विटामिन ए प्रामुख्याने गाजर, रताळे कंदमुळ, पालक ,केळी ,दूध ,दही आणि अंडी यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते.

आहारात करा ​विटामिन सी चा समावेश

विटामिन ई प्रमाणे विटामिन सी सुद्धा एक शक्‍तिशाली अँटीऑक्‍सीडेंट आहे जे आपल्या केसांच्या मुळाशी जाऊन कोलाजन नावाचे तत्व मजबूत बनवून ठेवते आणि यामुळे आपल्या केसांचे मूळ नेहमी तंदुरुस्त व मजबूत बनते. टरबूज, संत्री सारखे आंबट असणारे फळ, आंबा ,पपई ,अननस, स्ट्रॉबेरी, रसभरी, ब्लूबेरी या सारख्या पदार्थांमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळते.

झिंक युक्त पदार्थांचा करा समावेश ​

झिंक हे आपल्या शरीरात अँटी एंटीऑक्‍सीडेंट आहे, जे आपल्या श शरीरातील जे काही विषारी घटक आहेत त्यांना बाहेर पडण्यासाठी मदत करते तसेच जर आपले केस गळत असतील तर केस गळण्याची समस्या सुद्धा थांबवते आणि म्हणूनच डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रियांना केस गळती थांबवण्यासाठी भरपूर प्रमाणात झिंकयुक्त पदार्थ खाणे गरजेचे आहे. यामध्ये सी-फूड,रेड मीट, अंडी दही ,काजू ,बटर, काबुले चणे यासारखे पदार्थ सेवन करायला हवेत.

​विटामिन ई युक्त पदार्थ

आपल्या दैनंदिन आहारामध्ये नेहमी एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असणारे पदार्थांचा समावेश करायला पाहिजे जेणेकरून आपल्या केसांची वाढ नेहमी चांगली राहते त्याचबरोबर केसांचे आरोग्य मजबूत बनते. त्याचबरोबर असे काही व्हेजिटेबल ऑइल असतात, त्यात ऑलिव्ह सूर्य फुल, मकई तेल यांचा समावेश असतो त्याच बरोबर हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, कोबी यासारख्या भाज्यांमध्ये विटामिन ई यांचा समावेश असतो

मित्र धोनीसाठी धावून गेला जाडेजा, KKR ची बोलती केली बंद, IPL आरंभाआधीच सुरु झाली ठसन

कामाची बातमी! मार्कशीट, डिग्रीचा कागद जपून ठेवायची चिंता कायमची संपली? होय, खरंच!

chandrapur suicide : धक्कादायक! दोन मुलांसह महिलेने विहिरीत उडी मारली

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.