पोटॅशिअमची कमतरता दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
इतर पोषक तत्वांप्रमाणे पोटॅशिअम हेही आरोग्यासाठी खूप गरजेचे आहे. हे ब्लड प्रेशरची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तुम्ही दैनंदिन आहारात पोटॅशिअमयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता.
नवी दिल्ली: पोटॅशिअम (potassium) हे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त मिनरल (खनिज) आहे. ते ब्लड प्रेशरची पातळी (controls blood pressure) नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तसेच पोषक तत्वं शरीरातील पेशींमध्ये पोहोचवते. बऱ्याच लोकांमध्ये पोटॅशिअमची कमतरता असते. अशा परिस्थितीत, ते आहारात पोटॅशिअमयुक्त अनेक प्रकारचे पदार्थ (food itmes)समाविष्ट करू शकतात. हे पदार्थ आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. आपल्या रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवतात. इथे काही पोटॅशिअमयुक्त काही पदार्थ सांगण्यात आले आहेत, आपण त्यांचा आहारात समावेश करू शकता.
बटाटा
बटाट्याचा वापर विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. बटाट्यांमध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते. बटाट्याच्या विविध प्रकारात पोटॅशिअमच्या प्रमाणात भिन्न असते.
ॲवोकॅडो
ॲवोकॅडोमध्ये हेल्दी फॅट्स असतात. त्याशिवाय त्यामध्ये पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असते. तसेच त्यात सोडिअमचे प्रमाण फारच कमी असते. आपण कोशिंबीर म्हणून ॲवोकॅडोचे सेवन देखील करू शकता. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. यात व्हिटॅमिन के आणि फोलेट देखील असते.
रताळं
रताळ्याचे चाट अतिशय चविष्ट आणि हेल्दी असतं. त्यामध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते. तसेच रताळ्यामध्ये प्रोटीन्सही (प्रथिने) असतात. हे पोटॅशिअमची कमतरता दूर करण्याचे कार्य करते.
डाळिंब
तुम्ही दररोज एक ग्लास डाळिंबाचा रस पिऊ शकता. ते पोटॅशिअमचा एक चांगला स्रोत आहे. यात व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी देखील असते. यात असलेल्या फायबरमुळे आपले पोट बराच काळ भरलेले राहते
पालक
पालकामध्ये आयर्न (लोह) सह पोटॅशिअमही भरपूर प्रमाणात असते. पालकाचे सेवन तुम्ही भाजी, सूप किंवा सॅलॅडच्या स्वरुपातही करु शकता. त्यामध्ये अनेक पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असतात.
पांढरे बीन्स
पांढऱ्या बीन्समध्ये पोटॅशिअम मुबलक प्रमाणात आढळते. त्यामध्ये लोह, प्रथिने आणि फायबर देखील असतात. ते सहसा कोशिंबीर म्हणून खाल्ले जातात. आपण त्यांचा आहारात समावेश करू शकता.
बीट
बीटाच्या रसाचे सेवन केल्याने रक्ताची कमतरता दूर होते. ते पोटॅशिअमने समृद्ध आहे. तुम्ही बीटाची कोशिंबीर करूनही त्याचे सेवन करू शकता. त्यामध्ये पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असते. तसेच त्यात फोलेट देखील असते.