AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मासिक पाळीच्या दिवसात तू अल्कोहोलचं सेवन करतेय…थांब मग जरा, हे केल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते जाणून घे…

मुंबई : मासिक पाळी हे महिलांना दिलेलं वरदान आहे असं म्हणतात. महिन्यातील ते पाच दिवस महिलांसाठी फार कष्टाचे असतात. आजच्या धावपळीच्या जगात महिलांना घर आणि नोकरी या गोष्टी सांभाळत असतात. त्यामुळे महिन्यातील या 5 दिवसात महिलांना आराम मिळत नाही. आज सोशल लाईफमध्ये महिलांसुद्धा अकोल्होलचं सेवन करायला लागल्या आहेत. मग प्रश्न येतो की मासिक पाळीच्या दिवसात […]

मासिक पाळीच्या दिवसात तू अल्कोहोलचं सेवन करतेय...थांब मग जरा, हे केल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते जाणून घे...
मासिक पाळीतील समस्या
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 3:13 PM
Share

मुंबई : मासिक पाळी हे महिलांना दिलेलं वरदान आहे असं म्हणतात. महिन्यातील ते पाच दिवस महिलांसाठी फार कष्टाचे असतात. आजच्या धावपळीच्या जगात महिलांना घर आणि नोकरी या गोष्टी सांभाळत असतात. त्यामुळे महिन्यातील या 5 दिवसात महिलांना आराम मिळत नाही. आज सोशल लाईफमध्ये महिलांसुद्धा अकोल्होलचं सेवन करायला लागल्या आहेत. मग प्रश्न येतो की मासिक पाळीच्या दिवसात अकोल्होल सेवन केल्याने त्रास होतो का? या दिवसांमध्ये अकोल्होलचे सेवन योग्य आहे की अयोग्य? तर तज्ज्ञांच्या मते मासिक पाळीच्या दिवसात अकोल्होलचं सेवन करणे चुकीचे आहे. त्याची त्यांनी अनेक कारणं सांगितली आहेत. आपण पण जाणून घेऊयात काय आहेत ती कारणं.

1. पोटात कळा येणे

तुम्ही मासिक पाळीच्या दिवसात अकोल्होलचे सेवन करत असाल तर तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. या दिवसात महिलांना पोटात क्रॅम्प्स येतात. आणि या डिहायड्रेशनमुळे तुम्हाला जास्त क्रॅम्पसचा त्रास होऊ शकतो.

2. मूड खराब होणे

मासिक पाळीच्या दिवसात महिलांच्या शरीरात हार्मोन्स बदल होत असतात, त्यामुळे याचा परिणाम त्याचा मूडवर होतो. अशामध्ये जर आपण अकोल्होलचं सेवन केलं तर अकोल्होलमुळेही आपल्या शरीरात हार्मोन्स बदलतात. आणि याचा परिणाम तुमचं मूड जास्त खराब होण्याची शक्यता असते.

3. मॅग्नेशियमवर परिणाम

मासिक पाळीच्या दिवसात अकोल्होलचं सेवन केल्यास शरीरातील मॅग्नेशियम स्तरावर परिणाम होतो. शरीरातील इतर खजिनांवरही अकोल्होलचा परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्ही अकोल्होलचं सेवन केल्यास शरीरातील मॅग्नेशियमची पातळी कमी झाली तर शरीरातील साखरेचं प्रमाणही कमी होतं. आणि अशातून तुम्हाला इतर आजाराला समोरे जाण्याची भीती असते.

4. हार्मोन्सवर परिणाम

मासिक पाळीच्या दिवसात अकोल्होलचं सेवन केल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या हार्मोन्सवर दिसून येतात. शरीरातील एस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरोन हे हार्मोन्स वाढण्याची भीती असते. याचा परिणाम तुमच्या मासिक पाळीच्या दिवसांवर होऊ शकतो. विशेष म्हणजे अनियमित मासिक पाळीचा धोकाही वाढतो.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

संबंधित बातम्या

तुम्हीही कोंब आलेल्या बटाट्यांचा वापर करताय; शरीराला आहे घातक…

Corona Cases India : कोरोना रुग्णसंख्येची उसळी, तब्बल 7 महिन्यानंतर ओलांडला 3 लाखांचा टप्पा, 491 जणांचा मृत्यू

Corona Updates:  मराठवाड्यात कोरोनाचे उग्र रुप, औरंगाबादेत 24 तासात हजाराचा आकडा पार, इतर जिल्ह्यात काय स्थिती?

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.