Alia Bhatt : गरोदरपणातही आलिया भट्ट दिसतेय किती सुंदर… तुम्हालाही हवीय तिच्यासारखी चमकणारी त्वचा; तर, फॉलो करा ‘या’ टिप्स!

प्रेग्नंसी ग्लो: गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत महिलांची त्वचा खूप निस्तेज होते. काही वेळा त्वचा सावळी दिसते. अशा परिस्थितीत, अभिनेत्री आलिया भट्ट तिचा प्रेग्नेंसी ग्लो टिकवण्यासाठी काय करते, याबाबत जाणून घ्या, अधिक माहिती.

Alia Bhatt : गरोदरपणातही आलिया भट्ट दिसतेय किती सुंदर... तुम्हालाही हवीय तिच्यासारखी चमकणारी त्वचा; तर, फॉलो करा ‘या’ टिप्स!
गरोदरपणातही आलिया भट्ट दिसतेय किती सुंदर... तुम्हालाही हवीय तिच्यासारखी चमकणारी त्वचा; तर, फॉलो करा ‘या’ टिप्स!
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 8:53 PM

Alia Bhatt Pregnancy Skin Glow : सध्या आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीची चर्चा जोरात आहे. आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करताना तिच्या प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यापासून लोक आलिया भट्टचा चमकणारा आणि तजेलदार चेहरा पाहत आहेत. बहुतेक स्त्रियांची त्वचा गरोदरपणाच्या (Skin pregnancy) पहिल्या तिमाहीत खूप निस्तेज होते आणि हार्मोनल बदलांमुळे त्यांची त्वचा देखील खराब होऊ लागते. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री आपली प्रेग्नेंसी ग्लो टिकवण्यासाठी(maintain the pregnancy glow) काय करतात हा मोठा प्रश्न आहे. प्रेग्नेंसीची बातमी शेअर केल्यानंतर आलिया भट्टने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात, आलिया खूपच सुंदर दिसत आहे. या छायाचित्रांमध्ये तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक (A different glow) दिसत आहे. तुम्हालाही तुमच्या गरोदरपणात अशीच चमक मिळवायची असेल, तर या सोप्या टिप्स तुम्हाला मदत करतील.

जेवणाची विशेष काळजी घ्या

गरोदरपणात तुमचा आहार खूप महत्त्वाचा ठरतो. कारण ते तुमच्या बाळाला निरोगी ठेवण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावते. याशिवाय योग्य आहारामुळे तुमची त्वचा तजेलदार बनण्यास मदत होते. त्यामुळे गरोदरपणात तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध फळांचा समावेश केला पाहिजे. यासोबतच प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबर युक्त अन्न खाणे देखील खूप महत्वाचे आहे.

भरपूर झोप घ्या

गरोदरपणात महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असले तरी त्यांना झोपेचाही त्रास होतो. याच कारणामुळे अनेकवेळा ती तिची झोप पूर्ण करू शकत नाही, ज्याचा परिणाम तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. झोप न मिळाल्याने त्वचा निस्तेज दिसते आणि चेहरा कोमेजून जातो. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी किमान 8 ते 9 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

तणावापासून दूर राहा

तणाव कोणासाठीही चांगला नसला तरी, गर्भधारणेदरम्यान ताणतणाव अनेक प्रकारे हानिकारक असू शकतो. जास्त ताण घेतल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या मुलावर होऊ शकतो. याशिवाय, त्याचा स्पष्ट परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसून येतो. अशा परिस्थितीत, गर्भधारणेदरम्यान शक्य तितके सकारात्मक रहा आणि चांगले विचार करा. तणावापासून स्वतःला दूर ठेवा आणि आपल्या आवडत्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.

स्वतःला हायड्रेटेड ठेवा

गरोदरपणात स्वत:ला हायड्रेट ठेवणे फार महत्वाचे आहे. तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. याशिवाय भरपूर फळे, फळांचे रस आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. असे केल्याने तुमच्या बाळासाठी चांगलेच नाही तर तुमची त्वचा तजेलदार आणि चमकदारही होईल.

शीट मास्क

आलिया तिच्या स्किन केअर रूटीनबद्दल खूप सक्रिय आहे. तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये आलियाने चेहऱ्यावर शीट मास्क घातला आहे. शीट मास्क बाजारात सहज उपलब्ध आहेत. 15 दिवसातून एकदा याचे अनुसरण करा.

एलोवेरा जेल

त्वचेच्या काळजीमध्ये हा एक प्रकारचा रामबाण उपाय मानला जातो. मोठमोठया अभिनेत्री देखील ते नैसर्गिकरित्या त्यांच्या त्वचेवर लावतात आणि त्याद्वारे त्यांच्या त्वचेची काळजी घेतात. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा आणि नंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. यानंतर, नाईट क्रीम नक्कीच लावा.

फेस पॅक

एका भांड्यात मध, पपई आणि लिंबाचा रस मिसळा. तयार केलेला फेस पॅक त्वचेवर लावा आणि काही वेळ कोरडा राहू द्या. पॅक सुकल्यानंतर त्वचेला गुलाब पाण्याने मसाज करा. हा पॅक थंड पाण्याने स्वच्छ करा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा. हा पॅक महिन्यातून तीनदा लावा.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.