Aluminium Foil Paper : चपात्या कधी फॉइल पेपर मध्ये गुंडाळल्या आहेत का? एकदा वाचाच, होऊ शकतं गंभीर नुकसान
असे केल्याने चपाती किंवा पराठे गरम राहतात. पण तुम्हाला माहित आहे का की हे ॲल्युमिनियम फॉईल तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. फॉईल पेपरमध्ये अन्न ठेवण्याचे काय तोटे आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मुंबई: चपाती, पराठे उबदार ठेवण्यासाठी ॲल्युमिनियम फॉईलचा वापर केला जातो. त्याच बरोबर घरातून मुलांना किंवा ऑफिसला जाताना डब्बा देताना या ॲल्युमिनियम फॉईलचा वापर केला जातो. असे केल्याने चपाती किंवा पराठे गरम राहतात. पण तुम्हाला माहित आहे का की हे ॲल्युमिनियम फॉईल तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. फॉईल पेपरमध्ये अन्न ठेवण्याचे काय तोटे आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
फॉइल पेपरमध्ये चपाती पॅक करताना करू नका ही चूक-
अम्लीय पदार्थांचे पॅकिंग करणे टाळा
अम्लीय पदार्थ फॉईल पेपरमध्ये पॅक करू नयेत. कारण पॅकिंग करून या गोष्टी लवकर खराब होऊ शकतात. त्याचबरोबर त्यांचे रासायनिक संतुलनही बिघडू शकते. टोमॅटो चटणी, सायट्रिक फळे असे पदार्थ ॲल्युमिनियम फॉईल पेपरमध्ये पॅक करू नयेत.
खूप गरम पदार्थ पॅकिंग
अनेकदा लोक ॲल्युमिनियम फॉईलमध्ये खूप गरम अन्न पॅक करतात जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. अतिशय गरम अन्न पॅक केल्याने त्यात असलेले रसायन जेवणात मिसळले जाते. त्यामुळे गरमागरम जेवण पॅक करणे टाळावे. आधी ते थंड होऊद्या मगच ते पॅक करा.
शिळे अन्न
रात्री शिल्लक राहिलेले शिळे अन्न ॲल्युमिनियम फॉईलमध्ये कधीही गुंडाळून ठेवू नका. हे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे, ते खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.
सतत ॲल्युमिनियम फॉईलमध्ये पॅकिंग
जर आपण सतत ॲल्युमिनियम फॉईलमध्ये अन्न पॅक केले आणि काही तासांनंतर खाल्ले तर असे केल्याने प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. दुसरीकडे ॲल्युमिनियम फॉईलमध्ये ठेवलेले अन्न रोज खाल्ले तर आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)