Skin glow : अंकिता लोखंडेच्या पर्समध्ये ग्लोइंग स्किनचं सिक्रेट! जाणून घ्या नेमकं काय….

कोरोनाकाळात पार्लरमध्ये जाण्याऐवजी घरात राहून आणि घरगुती वस्तू वापरून महिलांनी चमकदार त्वचा मिळवली आहे. अभिनेत्रीही यात मागे नसून, अंकीता लोखंडेसारख्या अभिनेत्रीही घरगुती उपायांनी आपल्या त्वचेची काळजी घेण्यास प्राधान्य देतांना दिसतात.

Skin glow : अंकिता लोखंडेच्या पर्समध्ये ग्लोइंग स्किनचं सिक्रेट! जाणून घ्या नेमकं काय....
अभिनेत्री अंकिता लोखंडेImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 1:49 PM

मुंबई : कोरोनाच्या काळात बहुतांश लोकांनी घरीच वेळ घालवला आहे. या काळात पार्लर बंद असल्याने, महिलांनी घरगुती उपायांना प्राधान्य (Preference for home remedies) देत आपल्या त्वचेची काळजी घेतली. सिनेजगतातल्या, अभिनेत्रीही यात मागे राहिल्या नसून, या काळात त्वचेची काळजी घेण्याचे अनेक उपाय अभिनेत्रींनी सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. हे घरगुती उपाय इतके फायदेशीर असल्याची जाणीव झाल्याने, सर्वसामान्य महिलांबरोबरच अभिनेत्रीही आता हेच घरगुती उपाय वापरून आपली त्वचा चमकवित आहेत. पवित्र रिश्ता मालिकेतून घराघरात आपला ठसा उमटवणारी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) एकेकाळी तिच्या साधेपणासाठी ओळखली जात होती, मात्र आता ती पूर्णपणे बदलली आहे. ती पूर्णपणे ग्लॅमरस झाली असून, तिच्या त्वचेची चमक (Skin glow) कोणापासून लपलेली नाही. अंकिता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा मेकअपशिवाय फोटो शेअर करत असते. अंकिता तिची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी बाह्य उत्पादनांऐवजी घरगुती उपचार वापरण्यास प्राधान्य देते.

दूध आणि मध मिश्रण

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, त्वचा स्वच्छ आणि हायड्रेट ठेवणे सर्वात महत्वाचे आहे, अंकिता याची चांगली काळजी घेते. अंकिता जेव्हा जेव्हा घरात असते तेव्हा ती त्वचेची काळजी म्हणून दूध आणि मधाचे मिश्रण त्वचेवर लावते. दुधामध्ये कोलेजन प्रोटीन असते जे तुमची त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते. याशिवाय दूध त्वचा स्वच्छ करण्याचेही काम करते. दुसरीकडे, मध तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्याचे काम करते. याशिवाय, मधामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म देखील आढळतात. याशिवाय, तिला त्वचेवर बहुतेक नैसर्गिक गोष्टी वापरायला आवडतात.

पर्समध्ये नेहमी एक गोष्ट ठेवा

अंकिता तिच्या पर्समध्ये नेहमी एक गोष्ट ठेवते, ती म्हणजे गुलाबजल. ती तिच्या त्वचेवर वेळोवेळी वापरते. यामुळे तिची त्वचा नेहमी हायड्रेटेड राहते. याव्यतिरिक्त, गुलाबजल त्वचेला मॉइश्चरायझ करते. अंकिता सांगते की तिला गुलाब पाण्याचा सुगंध देखील आवडतो.

हे सुद्धा वाचा

सकाळची सुरुवात डिटॉक्स ड्रिंकने

अंकिता सकाळची सुरुवात डिटॉक्स ड्रिंकने करते. झोपेतून उठल्यानंतर ती लिंबू आणि मध मिसळून गरम पाणी पिते. यामुळे तिच्या शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडतात, तसेच तिची त्वचाही डिटॉक्स होते. याशिवाय ती जास्त तेल आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळते.

वर्कआउट हा देखील रुटीनचा भाग

अंकिताला जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा ती तासभर वर्कआउट करते. अंकिताचा असा विश्वास आहे की वर्कआऊट केवळ तुमचे आरोग्य सुधारत नाही तर तुमची त्वचा देखील निरोगी बनवते. अंकिताचा असा विश्वास आहे की सुंदर दिसण्यासाठी आतून आनंदी असणं खूप गरजेचं आहे. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी ती डान्स वगैरे करते.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.