AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस गळती खूपच वाढलीये, सारखे केस तुटतायत; हे आयुर्वेदिक तेल वापराच केस होतील जाड अन् लांब

केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांना लांब तसेच दाट बनवण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक तेलांचा वापर करायचा आणि कसा वापर करायचा तसेच त्यामुळे कोणते फायदे होतात याबदद्ल जाणून घेऊयात

केस गळती खूपच वाढलीये, सारखे केस तुटतायत; हे आयुर्वेदिक तेल वापराच केस होतील जाड अन् लांब
| Updated on: Dec 14, 2024 | 4:07 PM
Share

लांब आणि दाट केस कोणत्या स्त्रियांना आवडणार नाही.  कारण लांब,दाट केस स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालतात आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीला तिचे केस लांब आणि दाट हवे असतात. पण सध्याच्या धावपळीत किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केसगळतीची समस्या प्रचंड प्रमाणात वाढत चालाली आहे,

काहीजण केसांसाठी अनेक ट्रीटमेंट घेतात किंवा काहीजण महागडे तेल आणि शॅम्पूही वापरतात पण त्यामुळेही काही फरक पडत नाही. पण आज अशा काही आयुर्वेदिक तेलांबद्दल जाणून घेऊयात ज्यांच्या वापरामुळे केसगळतीची समस्या नक्कीच दूर  होऊ शकेल. केसांना सुंदर आणि जाड बनवेल.

आयुर्वेदात केस गळणे थांबवण्यासाठी आणि ते निरोगी बनवण्यासाठी तसेच केस लांब आणि दाट करण्यासाठी अनेक प्रकारच्या तेलांचा उल्लेख केला आहे. या तेलांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचे घातक रसायने नसतात . या तेलांमुले केसांची वाढ होण्यास मदत करतात.

केसांच्या वाढीसाठी आयुर्वेदिक तेल

भृंगराज तेल

औषधी वनस्पतींचा राजा म्हणून ओळखले जाणारे भृंगराज तेल. हे तेल लावल्याने रक्ताभिसरण वाढवण्यास मदत होते. यामुळे केस गळणे, कोंडा होणे आणि केसांचा कोरडेपणा यासारख्या केसांशी संबंधित अनेक समस्या कमी होऊ लागतात, उत्तम परिणामांसाठी भृंगराज तेल तिळाच्या तेलात मिसळून लावावे. दोन्ही तेलांचे मिश्रण करून आणि आठवड्यातून एकदा जरी केसांना लावले किंवा मसाज केल्यास फायदे लवकर दिसून येतील.

आवळा तेल

आवळा तेल व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध असते. या तेलाच्या वापराने केसांच्या मुळे मजबूत होतात. यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते. त्यामुशे केस दाट दिसू लागतात. आवळा तेल नारळ किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून लावल्यास जास्त फायदा होतो.

ब्राह्मी तेल

ब्राह्मी तेल केसासंबधी समस्या दूर करते आणि डोकेही शांत करते. यामुळे तणाव कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते. या तेलाच्या वापरामुळे केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या कमी होते. नारळ आणि ऑलिव्ह ऑईल मंद आचेवर गरम करून त्यात ब्राह्मी तेल मिक्स करून लावल्यास अधिक फायदा होतो. तसेच त्यात तुम्ही भृंगराज पावडर, आवळा पावडर आणि शिककाई पावडर एकत्र करूनही लावू शकता.

मेंदी तेल

केसांसाठी नैसर्गिक रंग म्हणून काम करण्याबरोबरच, मेंदी केसांचे आरोग्य सुधारून त्यांची जलद वाढ करण्यास मदत करते. मेंदीचे तेल लावल्याने केसांमध्ये नैसर्गिक तेल तयार होण्याल मदत होते. ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते.

मेथी तेल

मेथी हे केस जलद वाढवण्यासाठी आणि केस गळती रोखण्यासाठी त्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते. मेथीचे तेल लावल्याने टाळूचे आरोग्य सुधारते आणि केसांशी संबंधित समस्या कमी होऊ लागतात.

तिळाचे तेल

तिळाच्या तेलात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. यासोबतच तिळात ओमेगा फॅटी ॲसिड असते. हे टाळूचे पोषण करून कोरडेपणा दूर करण्यास मदत करते. हे केसांच्या वाढीस गती देण्यास मदत करते.

हिबिस्कस तेल

हिबिस्कस तेलामध्ये अमीनो ॲसिड आणि अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे असतात आणि त्यामुळे केस मजबूत होतात आणि स्प्लिट एंड्सची समस्या कमी होते. हे केसांना कोरडे होण्यापासून वाचवते आणि केसांच्या वाढीस गती देते.

तेल कसे वापरावे ?

या सर्व प्रकारच्या तेलांमुळे केसांच्या वाढीला गती मिळू शकते. ते लावण्यापूर्वी ते कोमट करून बोटांच्या सहाय्याने केसांच्या मुळांवर हळू हळू लावावे. हे तेल केसांवर काही वेळ राहू द्यावं आणि नंतर केमिकल फ्री शॅम्पूने केस स्वच्छ करावेत.

(डिस्क्लेमर – ही माहिती केवळ उपलब्ध स्रोतांवरून घेण्यात आली आहे. वापरण्याआधी एकदा वैद्यकीय मतांचा पर्याय नक्कीच निवडू शकता. अधिक माहितीसाठी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.