AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात स्किनकेअर करताना चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ 3 गोष्टी

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक लोकं घरगुती उपायांचा वापर करतात. कारण घरगुती उपाय केल्याने चेह-यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की काही गोष्टींचा वापर तुमच्या त्वचेलाही हानी पोहोचवू शकतो. तुमच्या त्वचेसाठी कोणत्या गोष्टी वापरू नयेत ते जाणून घ्या.

उन्हाळ्यात स्किनकेअर करताना चेहऱ्यावर  चुकूनही लावू नका  'या' 3 गोष्टी
| Edited By: | Updated on: Mar 30, 2025 | 3:36 PM
Share

साधारणपणे प्रत्येकाला आपली त्वचा चांगली, चमकदार आणि तेजस्वी दिसावी असे वाटते. या कारणास्तव लोकं वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती उपचार वापरून पाहतात. त्वचेच्या काळजीसाठी नैसर्गिक घटकांचा वापर करण्याची प्रवृत्ती भारतीय परंपरेत शतकानुशतके प्रचलित आहे आणि यातील अनेक टिप्स खरोखर प्रभावी आहेत. उन्हाळ्यात लोकं त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी विविध घरगुती उपायांचा वापर करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की काही घरगुती उपाय, जे आपण त्वचेसाठी फायदेशीर मानतो, ते खरोखर त्वचेच नुकसान करू शकतात?

बऱ्याच वेळा विचार न करता, आपण आपल्या चेहऱ्यावर काही गोष्टी लावतो ज्या त्वचेसाठी हानिकारक असतात आणि आपली त्वचा कोरडी तसेच त्वचेवर पुरळ सारख्या समस्या निर्माण होतात किंवा संवेदनशील बनवू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा तीन गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या चुकूनही चेहऱ्यावर लावू नयेत. या गोष्टी तुमच्या त्वचेच्या फायद्याऐवजी मोठी समस्या निर्माण करू शकतात.

बेकिंग सोडा

आपल्यापैकी बहुतेक जण चेहरा एक्सफोलिएशन करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करतात. कारण हा सोडा बहुतेकदा स्क्रब किंवा मुरुमांवर उपचार म्हणून वापरला जातो, परंतु तो त्वचेसाठी अजिबात सुरक्षित नाही. त्याच्या अल्कधर्मी स्वभावामुळे तुमच्या त्वचेचा नैसर्गिक पीएच संतुलन बिघडू शकतो, ज्यामुळे त्वचा कोरडी, लालहोते. त्याच्या वापराने त्वचा अधिक कोरडी आणि संवेदनशील होऊ शकते. तसेच, नैसर्गिक तेल काढून टाकल्याने संसर्ग आणि त्वचेची जळजळ वाढू शकते. त्याच वेळी, दीर्घकाळ वापरल्याने त्वचा पातळ आणि कमकुवत होऊ शकते. जर तुम्हाला त्वचेचे एक्सफोलिएशन करायचे असेल तर ओटमील, कॉफी स्क्रब किंवा हळद आणि दही यांचे मिश्रण हे चांगले पर्याय ठरू शकतात.

लिंबू

लिंबाचा रस हा एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे, परंतु त्यात जास्त प्रमाणात सायट्रिक ऍसिड असते, जे तुमची त्वचा अधिक संवेदनशील बनवू शकते. विशेषतः उन्हात बाहेर पडल्यानंतर लिंबू लावल्याने सनबर्न, लालसरपणा आणि हायपरपिग्मेंटेशनचा धोका वाढतो. यासोबतच त्वचेवर जळजळ, पुरळ आणि खाज येऊ शकते. त्वचेचा पीएच संतुलन बिघडू शकतो, ज्यामुळे कोरडेपणा आणि त्वचेचे नुकसान होऊ शकते. म्हणून, जर तुम्हाला त्वचा चमकदार बनवायची असेल तर तुम्ही काकडीचा रस, कोरफडीचा जेल किंवा टोमॅटोचा रस वापरू शकता.

बर्फ देखील हानी पोहोचवू शकतो

बरेच लोक त्वचा घट्ट करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी बर्फाचा वापर करतात. तथापि, बर्फ थेट लावल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. बर्फाच्या थंडपणामुळे त्वचेच्या पेशींचे नुकसान होऊ शकते आणि फ्रॉस्टबाइट होण्याचा धोका वाढू शकतो. जास्त वेळ बर्फ लावल्याने त्वचेच्या पेशींना नुकसान होऊ शकते. त्वचेच्या रक्ताभिसरणावरही परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे त्वचेवर डाग येऊ शकतात. जर तुम्हाला चेहऱ्यावर थंडावा हवा असेल तर गुलाबपाणी किंवा थंड काकडीचा रस लावा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.