पिझ्झा, बर्गर खाताय तर सावधान; फास्ट फूडमुळे रोगप्रतिकारक शक्तीच शरीराला पोहोचवतीये हानी
सध्या फास्ट-फूड (Fast food) खाण्याचा ट्रेंड जगभरात वाढत आहे. अनेक जण फास्ट फूड मोठ्या आवडीने खातात. मात्र फास्ट फूडचा आहारामध्ये अधिकाधिक वापर हा अनेक आजारांसाठी निमंत्रण ठरत आहे.
नवी दिल्ली : सध्या फास्ट-फूड (Fast food) खाण्याचा ट्रेंड जगभरात वाढत आहे. अनेक जण फास्ट फूड मोठ्या आवडीने खातात. मात्र फास्ट फूडचा आहारामध्ये अधिकाधिक वापर हा अनेक आजारांसाठी निमंत्रण ठरत आहे. फास्ट फूडमुळे लठ्ठपणासोबतच आणखी काही नव्या आजारांचा धोका देखील निर्माण झाला आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार फास्ट फूडच्या सेवनामुळे मानवामध्ये असलेली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity power) हीच शरीराला हानी पोहोचवत आहे. लंडनमधील फ्रान्सिस क्रिक संस्थेच्या वतीने हा अहवाल सादर करण्यात आला आहे.
ऑटोइम्यून डिसिजच्या प्रमाणात वाढ
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार सध्या पश्चिमेकडील देशांसोबतच अशिया खंडात देखील ऑटोइम्यून डिसिजच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हा एक असा अजार आहे, की ज्यामध्ये मानवाची रोगप्रतिकारक शक्ती हीच त्याच्या शरीराला हानी पोहोचवते. फ्रान्सिस क्रिक संस्थेशी संबंधित असलेले शास्त्रज्ञ जेम्स ली यांनी याबाबत बोलताना सांगितले की, सध्या जगभरात ऑटोइम्यून डिसिजचे प्रकरणे मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. आहारामध्ये सातत्याने बर्गर पिझ्झा यासारख्या फास्ट फूडचा समावेश केल्यामुळे अशा प्रकारचे आजार उद्धभवतात. तसेच फास्ट फूडमुळे पोटाशी संबंधित इतर आजारात देखील वाढ झाल्याचे जेम्स ली यांनी सांगितले.
अनेक आजारांचा धोका
या संस्थेमधील अन्य एक संशोधक क्यारोला विनेसा यांनी या अहवालाबाबत बोलताना सांगिते की, फास्ट फूडमुळे तुमच्या शरीरामधील रोगप्रकिकारक शक्ती (Immunity powar)ही कन्फ्युज होत आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर फास्ट फूडच्या सेवनामुळे तुमच्यामध्ये असलेल्या रोगप्रकिकारक शक्तीला तुमच्या शरीरामधील चांगल्या पेशी आणि आजारी पेशी यामधील फरक ओळखने शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडतात. याचाच अर्थ असा की फास्ट फूडच्या सेवनामुळे तुमच्यामधील रोगप्रतिकारक शक्तीच तुमच्या शरीराला हानी पोहोचवते. तुमच्यामधील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने तुम्हाला मधुमेह, थायरॉईड, लठ्ठपणा, पोटाशी संबंधित विविध समस्या असे अनेक आजार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.
संबंधित बातम्या
कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा लहान मुलांसाठी ओमिक्रॉन अधिक घातक?, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
Turmeric side effects : या कारणांमुळे हळदीचे अति सेवन ठरू शकते धोकादायक
होम आयसोलेटेड रुग्णांना हेल्थ किट देणार, कॉलही करणार, आरोग्यमंत्री काय म्हणाले? वाचा सविस्तर