Beauty tips : बटाट्यापासून वाढवा चेहऱ्यावरील चमक; असा करा बटाट्याचा वापर!

बटाट्याचे गुणधर्म त्वचेच्या मृत पेशी सहज काढून टाकू शकतात. जाणून घ्या, कोणत्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही बटाट्यापासून चेहऱ्याची चमक मिळवू शकता. बटाट्यापासून त्वचेची काळजी घेण्याच्या या आहेत सर्वोत्तम टिप्स.

Beauty tips : बटाट्यापासून वाढवा चेहऱ्यावरील चमक; असा करा बटाट्याचा वापर!
बटाट्यापासून वाढवा चेहऱ्यावरील चमक; असा करा बटाट्याचा वापर!
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 7:46 PM

फक्त बटाट्यापासून काही बनवलं तर तेही खूप चवदार लागते. बटाट्याचे फायदे (Benefits of potatoes) केवळ चवीपुरते मर्यादित नाहीत. तर, चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यातही ही भाजी पहिल्या क्रमांकावर आहे. बटाट्यामध्ये त्वचेचे सौदर्यं वाढवण्याचे सर्व गुणधर्म आहेत. बटाटयाचा वापर योग्य पद्धतीने केल्यास, तुमची त्वचा निर्दोष आणि चमकदार दिसेल जसे तुम्ही फेशियल केल्यावर त्वचा चमकते त्याचप्रमाणे बटाट्याचाही योग्य वापर केल्यास, तुम्हाला फेशियलसारखी चमक मिळविता येते. किचनमध्ये सहज उपलब्ध होणारा हा बटाटा त्वचेची काळजी (skin care) घेण्यातही उत्तम आहे. ब्लीचिंग एजंट म्हणून काम करणाऱ्या बटाट्यामध्ये अनेक पोषक आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे त्वचेला हानिकारक पदार्थांपासून वाचवतात आणि ती चमकदार आणि निरोगी (Bright and healthy) बनवतात. बटाटा स्टार्च त्वचेच्या काळजीमध्ये सर्वोत्तम परिणाम देऊ शकतो आणि या कारणास्तव आज अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये देखील याचा वापर केला जात आहे. त्वचेवर घाण साचून राहणे, हवामान आणि इतर कारणांमुळे निस्तेजपणा येऊ शकतो. बटाट्याचे गुणधर्म त्वचेच्या मृत पेशी सहज काढून टाकू शकतात. जाणून घ्या, कोणत्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही बटाट्यापासून चेहऱ्याची चमक मिळवू शकता.

बटाट्याचा रस आणि दही

बटाट्यासोबत दही वापरल्यास दुहेरी फायदे मिळू शकतात. या दोन्हीची ही रेसिपी त्वचा हायड्रेट ठेवेल आणि अतिरिक्त तेल देखील शोषून घेईल. एका भांड्यात थोडं दही घ्या आणि त्यात तीन चमचे बटाट्याचा रस घाला. चिमूटभर हळद मिसळल्यानंतर ब्रशने त्वचेवर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवा.

कोरफड आणि बटाटा

त्वचेची किंवा केसांची काळजी कोरफड जेल नेहमीच रामबाण उपाय म्हणून काम करते. बटाट्याची पेस्ट बनवा आणि त्यात कोरफडीचे जेल मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे कोरडे होऊ द्या. आता हातामध्ये एलोवेरा जेल घ्या आणि चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. आता चेहरा धुवा आणि तुम्हाला स्वतःला दिसेल की चेहऱ्याचा रंग सुधारला आहे.

हे सुद्धा वाचा

तांदूळ आणि बटाटे

तांदूळ त्वचेच्या काळजीमध्येही सर्वोत्तम मानला जातो. तुम्हाला फक्त तांदूळ आणि बटाट्याचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावायचा आहे. यासाठी एका भांड्यात तांदूळ उकळून त्यातील पाणी काढून टाकावे. ते थंड झाल्यावर त्यात बटाट्याचा रस घालून कापसाच्या मदतीने त्वचेवर लावा. हा फेस मास्क लवकर सुकतो, त्यामुळे एका वेळी तीन वेळा चेहऱ्यावर लावा. आता सामान्य पाण्याने चेहरा धुवा.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.