आपण सगळे बडीशेप खातोय खरं, पण फायदे माहित आहेत का?
बडीशेप थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यात बडीशेपचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. बडीशेपचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि पोटाची उष्णताही शांत होते.
मुंबई: बडीशेप सामान्यत: मसाला म्हणून वापरली जाते. त्याचबरोबर बडीशेप अन्न पचविण्यास तसेच अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. बडीशेपमध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फायबर आणि मॅग्नेशियम सारखे घटक असतात. त्याचबरोबर बडीशेप थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यात बडीशेपचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. बडीशेपचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि पोटाची उष्णताही शांत होते.
उन्हाळ्यात बडीशेपचे
सेवन केल्यास त्याची चव थंड असल्याने शरीर थंड होते. त्यामुळे जर तुम्हाला पोटाच्या उष्णतेचा त्रास होत असेल तर बडीशेपचे सेवन सुरू करा. त्याचबरोबर दररोज बडीशेपचे सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होते आणि रक्त स्वच्छ राहते.
पचनसंस्था व्यवस्थित राहते
उन्हाळ्यात अनेकदा पचनाच्या समस्या उद्भवतात. अशावेळी जर तुम्ही बडीशेपचे सेवन केले तर ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले फायबर तुमची पचनसंस्था मजबूत करण्याचे काम करते. त्याचबरोबर याचे सेवन केल्याने पचनही योग्य होते. त्यामुळे तुम्ही दररोज याचे सेवन करू शकता.
उन्हाळ्यात वजन कमी करायचं असेल तर बडीशेपचं सेवन करायला हवं. बडीशेप आपली पचनक्रिया सुधारण्यास तसेच चयापचय वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.
रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल
बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय शरीराला आजारांशी लढण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्ही दररोज याचे सेवन करू शकता.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)