AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उंदराने केबल कुरतडल्याने 1.80 कोटींचे सिटी स्कॅन मशीन सहा महिन्यांपासून बंद, चिकलठाण्यातील प्रकार पाहून आरोग्य मंत्री राजेश टोपे संतापले

दुसऱ्या लाटेपूर्वीच मशीन दुरुस्ती होणे गरजेचे होते. जिल्हा शल्यचिकित्सक हे रुग्णालयाचे प्रमुख असतात. त्यांचे हे काम असते. त्यामुळे उंदरांचा बंदोबस्त त्वरीत करा. पेस्ट कंट्रोल करा, असे आदेश राजेश टोपे यांनी दिले.

उंदराने केबल कुरतडल्याने 1.80 कोटींचे सिटी स्कॅन मशीन सहा महिन्यांपासून बंद, चिकलठाण्यातील प्रकार पाहून आरोग्य मंत्री राजेश टोपे संतापले
राजेश टोपे, आरोग्य मंत्री.
| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 7:20 PM
Share

औरंगाबाद: चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन नोव्हेंबर 2020 पासून बंद आहे. रुग्णालयातील हे मशीन तब्बल 1.80 कोटी रुपये किंमतीचे असून केवळ उंदराने वायर कुरतडल्यामुळे ते बंद पडल्याचे रविवारी समोर आले. ही माहिती कळताच औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना येथे पाहणी करण्यासाठी आलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. तसेच पेस्ट कंट्रोल करून येथील उंदरांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

दुरुस्तीसाठी 12 लाख निधी लागणार

गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हे मशीन दुरुस्त करण्यासाठी 12 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सिटी स्कॅनची प्रचंड गरज असताना ते बंद राहिले, याबद्दल राजेश टोपे यांनी नाराजी व्यक्त केली.

उंदरांचा बंदोबस्त करा! मशीन बंद राहणे, हा मोठा गुन्हा

उंदरांनी केबल कुरतडल्याने एवढे महत्त्वाचे मशीन सहा महिन्यांपासून बंद राहिले. ही बाब कळताच आरोग्यमंत्री राजेश टोपे चांगलेच संतापले. सिटी स्कॅन मशीन वर्षभरापासून बंद राहणे, हा खूप मोठा गुन्हा आहे. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांच्या काळातील हा प्रकार आहे. दुसऱ्या लाटेपूर्वीच मशीन दुरुस्ती होणे गरजेचे होते. जिल्हा शल्यचिकित्सक हे रुग्णालयाचे प्रमुख असतात. त्यांचे हे काम असते. त्यामुळे उंदरांचा बंदोबस्त त्वरीत करा. पेस्ट कंट्रोल करा, असे आदेश राजेश टोपे यांनी दिले. दरम्यान यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून दुरुस्तीसाठी निधी मिळणार असल्याचे डॉय मुरंबीकर यांनी सांगितले.

रुग्णालयातील इतर समस्यांचाही आढावा घेतला

रविवारी रुग्णालयात झालेल्या बैठकीला सर्व प्रमुख अधिकारी उपस्थिती होते. यावेळी टोपे यांनी रुग्णालयातील समस्यांचा आढावा घेतला. तेव्हा रक्तपेढी नसल्याने घाटीत जावे लागते, सोनोग्राफी मशीन आहेत, पण त्यातून मोजक्याच सोनोग्राफी होतात. सर्जन्स आहेत, पण यंत्रसामग्रीअभावी शस्त्रक्रिया होत नाही. वेतन वेळेवर होत नाही, अशा बाबी डॉक्टरांनी टोपे यांच्यासमोर मांडल्या. या रुग्णालयात डायलिसीस मिशीन तातडीने आल्या पाहिजेत अशा सूचनाही टोपे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून दिल्या. दरम्यान, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक हे आढावा बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांची बदली करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले.

इतर बातम्या- 

Aurangabad Gold: आज सोने पंचेचाळीशीच्या दिशेने… पाच वर्षात नव्वदी पार करणार, औरंगाबादचे काय आहेत भाव?

रावसाहेब दानवेंमुळेच औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रखडले, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.