loneliness : एकटेपणा तुम्हाला भविष्यात ‘बेरोजगार’ बनवू शकतो? जाणून घ्या, अभ्यास काय म्हणतो
एकाकीपणाचे दुष्परिणाम: जर तुम्ही अधिक काळ एकटे राहात असाल तर, भविष्यात तुमची नोकरी गमावण्याची शक्यता जास्त असते. तसेच जर तुम्ही बेरोजगार असाल तर, तुम्हाला एकटेपणा जास्त जाणवतो. या दोन परिस्थिती एकमेकांशी संबंधित आहेत. जाणून घ्या, नवीन अभ्यासात संशोधकांना काय आढळले आहे.
नवीन संशोधनानुसार, एकाकीपणाचा अनुभव भविष्यातील बेरोजगारीच्या उच्च जोखमीशी जोडलेला असल्याचे समोर आले आहे “अनेकदा एकटेपणा जाणवतो” असे म्हणणारे लोक नंतर त्यांची नोकरी गमावण्याची शक्यता असते. एक्सेटर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या नेतृत्वाखालील टीमने ‘बीएमसी पब्लिक हेल्थ’ जर्नलमध्ये संशोधनाचे निष्कर्ष (Research findings) प्रकाशित केले आहेत. मागील संशोधनात असे दिसून आले आहे की, बेरोजगार राहिल्याने एकाकीपणा येऊ शकतो. एकटेपणामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एकटेपणाची भावना एखाद्याच्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करू शकते. आता एका नवीन अभ्यासातून असे समोर आले आहे की, ज्या लोकांना एकटेपणा जाणवतो त्यांना भविष्यात बेरोजगारीचा धोका (Risk of unemployment) जास्त असतो. एक्सेटर विद्यापीठाचे संशोधक आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक निया मारिश यांनी सांगितले की, एकाकीपणा आणि बेरोजगारी या दोन्हींचा आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर ( financial status) परिणाम होतो.
एकटेपणा आणि बेरोजगारी यांचा संबंध
“अनेकदा एकटेपणा जाणवतो” असे म्हणणारे लोक नंतर त्यांची नोकरी गमावण्याची शक्यता असते. अभ्यासासंबंधीचे सर्व संशोधन बीएमसी पब्लिक हेल्थ मॅगझिनमध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधकाच्या मते, जर तुम्ही जास्त एकटे असाल तर, तुमची नोकरी गमावण्याची शक्यता जास्त असते. तसेच जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्हाला एकटेपणा जास्त जाणवतो. या दोन्ही परिस्थिती एकमेकांशी संबंधित आहेत. एकटेपणा कमी केल्याने बेरोजगारी कमी होईल आणि रोजगारामुळे एकटेपणा दूर होईल, ज्यामुळे आरोग्य आणि जीवनाच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम होईल.
काय आढळले अभ्यासात
या अभ्यासात 15 हजारांहून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. यासाठी, संशोधक टीमने 2017-2019 दरम्यान सहभागींच्या प्रतिसादाच्या आधारे डेटा घेतला. त्यानंतर, 2018-2020 दरम्यान, वय, लिंग, अनुवांशिकता, शिक्षण, वैवाहिक स्थिती, घरची स्थिती आणि मुले अशा नियंत्रित घटकांची माहिती घेऊन अभ्यास सुरू केला. एकाकीपणा आणि बेरोजगारी या दोन्ही समस्या एकत्रितपणे नकारात्मक चक्र निर्माण करतात, असे या अभ्यासात आढळून आले आहे. त्यामुळे काम करणाऱ्या वयातील लोकांच्या माध्यमातून एकटेपणाचा समाजावर होणारा परिणाम गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात
ज्येष्ठ लेखिका प्रोफेसर अँटोनिएटा मेडिना-लारा म्हणाल्या: “एकाकीपणा ही एक अविश्वसनीयपणे महत्त्वाची सामाजिक समस्या आहे, ज्याचा मानसिक आरोग्य आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामाच्या दृष्टीने विचार केला जातो.” “आमचे निष्कर्ष असे सूचित करतात की, याचे व्यापक परिणाम देखील असू शकतात,” व्यक्ती आणि अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो.