Child Care Tips : तुमच्या मुलांना सर्दी खोकला सारख्या समस्या टाळण्यासाठी काय करताय? जाणून घ्या काही महत्त्वाच्या टिप्स!
लहान मुलांची रोग प्रतिकारक शक्ती (Immune System) खूपच नाजूक आणि कमजोर असते म्हणूनच त्यांना लगेच एखादा आजार होतो अन् मुलं आजारी पडतात.
मुंबई : लहान मुलांची रोग प्रतिकारक शक्ती (Immune System) खूपच नाजूक आणि कमजोर असते म्हणूनच त्यांना लगेच एखादा आजार होतो अन् मुलं आजारी पडतात. विशेष करून लहान मुलांना कोणत्याही प्रकारचे वायरल इन्फेक्शन (Infection) लगेच होते आणि म्हणूनच अशा वेळी जर वातावरणामध्ये जरासा ही बदल झाला तर लहान मुलांवर त्याचा परिणाम लगेच जाणवू लागतो. थंडीचे दिवस संपण्याच्या मार्गावर आहेत आणि काही दिवसांतच गरमी म्हणजेच उन्हाळा ऋतु सुरू होईल अशातच बदललेल्या वातावरणामुळे लहान मुलांच्या शरीरांमध्ये बदल प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत जर तुमच्या आजूबाजूला लहान मुले असतील तर प्रामुख्याने सर्दी व खोकला (Cold and Cough) यासारखी वायरल इन्फेक्शन निर्माण करणाऱ्या आजारांची लक्षणे होताना पाहिले असेल. लहान मुलांना सर्दी खोकला झाल्यावर त्यांची चिडचिड होते आणि मुलं सारखे रडू लागतात अशावेळी त्यांना त्रास सुद्धा खूप होतो. या वायरल इन्फेक्शन पासून लहान मुलांचे संरक्षण करायचे असल्यास तर आपल्याला काही उपचार करणे गरजेचे आहे. लहान मुलांची विशेष काळजी घेणे देखील आवश्यक आहे म्हणूनच या लेखामध्ये आम्ही लहान मुलांची काळजी आपल्याला कशा पद्धतीने घ्यायची आहेत आणि लहान मुलांना कोणत्याही प्रकारचे वायरल इन्फेक्शन होऊ नये यासाठी कोण कोणते घरगुती उपचार करायचे आहेत त्याबद्दल जाणून घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा सांगणार आहोत.
अंगावरचे दूध पाजा
जर तुमचे लहान मुलं अंगावरचे दूध पित असेल तर अशावेळी सर्दी खोकला झाल्यावर तुमच्या तान्ह्याला अवश्य अंगावरील दुध पाजा. आईचे दूध बाळासाठी अमृत समान मानले जाते आणि त्याचबरोबर आईच्या दुधामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे बाळाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत तर होतेच त्याच बरोबर त्यांना आराम देखील मिळतो. जर आजारपणामुळे मुलं दूध पीत नसेल तर अशा वेळी थोड्या थोड्या वेळानंतर बाळाला अंगावरचे दूध आवश्य पाजावे अशावेळी इन्फेक्शन पासून संरक्षण मिळवायचे असेल तर आईचे दूध एका पॉवर डोस औषधाप्रमाणे कार्य करते.
लसूण आणि ओव्याची धुरी
ओवाचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक गुणधर्म सांगण्यात आलेले आहे. ओवा शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करतो तसेच लसूण मध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात अशावेळी लहान मुलांना लसूण आणि ओव्याचा धूर दिल्यास लहान मुलांसाठी सर्दी खोकला पासून संरक्षण मिळते तसेच यासाठी आपल्याला 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि 1 मुठ भर ओवा घ्यायचा आहे. आता हे दोन्ही पदार्थ आपल्याला तव्यावर टाकायचे आहे जोपर्यंत या दोन्ही पदार्थांमधून धूर निघत नाही तोपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे. जेव्हा या दोन्ही पदार्थ मधून धूर निघू लागेल तेव्हा तुम्हाला जाणवेल कि दोन्ही पदार्थ मधून येणारा सुगंध हा तुम्हाला प्रसन्न करणारा ठरेल यामुळे सर्दी खोकल्यामुळे लहान बाळांना जर श्वास घेण्यास त्रास होत असेल अश्यावेळी मुलांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी हा सुगंध लाभदायक ठरेल. अशा प्रकारे आपल्याला लसूण आणि ओव्याची धुरी द्यायची आहे असे केल्याने मुलांना सर्दी खोकल्यापासून लवकरच सुटका मिळेल.
मोहरीच्या तेलाची मालिश
मोहरीच्या तेलामध्ये ओवा आणि लसूण टाकून आपल्याला गरम करायचे आहे आणि जेव्हा हे तेल कोमट होईल तेव्हा लहान मुलांच्या पायांच्या कोमल तळव्यांना हे तेल लावून मालिश करायची आहे आणि त्यानंतर लहान मुलांच्या छातीवर हे तेल लावून हलकासा मसाज देखील करायचा आहे असे केल्याने मुलाच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होईल आणि छातीत जो कफ साचला आहे तो हळू-हळू वितळू लागेल, असे आपण रात्री झोपताना नेहमी केले तर तुमच्या बाळाला रात्री झोप देखील व्यवस्थित लागेल अन् सकाळी तुमच्या मुलांची सर्दी खोकला पूर्णपणे नष्ट झालेली असेल.
टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
इतर बातम्या :