‘खोबरेल तेल’ आणि ‘कापूर’ यांच्या वापरातून करा, उन्हापासून केसांचे संरक्षण.. जाणून घ्या महत्वाच्या टिप्स !

उन्हाळ्यात कडक उन्हामुळे आणि डोक्याला घाम येणे यामुळे केसांशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा स्थितीत टाळूला खाज सुटणे, केस गळणे आणि तुटणे हे लक्षणीय वाढते. अशा परिस्थितीत या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता.

‘खोबरेल तेल’ आणि ‘कापूर’ यांच्या वापरातून करा, उन्हापासून केसांचे संरक्षण.. जाणून घ्या महत्वाच्या टिप्स !
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 5:17 PM

उन्हाळ्यात केसांच्या अनेक समस्या तोंड वर काढतात. केसांत कोंडा (dandruff) होणे, घामामुळे खाज सुटणे, केसांना दुर्गंधी येणे इत्यादी अनेक समस्या उन्हाळ्यात उद्भवतात. केसांच्या या समस्या दूर करण्यासाठी आपण ‘खोबरेल तेल’ आणि ‘कापूर’ यांचा वापर करून, केसांचे संरक्षण (Hair protection) करू शकतो. उन्ह्याळ्यात केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, खोबरेल तेल आणि कापूर दोन्ही मिसळून डोक्याला मसाज करा. या तेलामध्ये (Oil) दाहक-विरोधी, प्रतिजैविक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यात व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन (कोकोनट ऑइल) सारखे पोषक घटक देखील आढळतात. हे केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. दुसरीकडे, कापूरमध्ये सॅबिनीन, फेल्डरेनोन आणि लिमोनेन सारखे पोषक घटक असल्याने, ते केसांचे चांगल्या पद्धतीने केसांचे पोषण (Hair nutrition) करण्यास सहाय्यक ठरतात. चला तर मग, जाणून घेऊया उन्हाळ्यात केंसाचे संरक्षण करण्यासाठी खोबरेल तेल आणि कापूर वापराची योग्य पद्धत

अशा प्रकारे लावा तेल

खोबरेल तेल थोडावेळ उन्हात ठेवा, असे केल्याने ते थोडे गरम होईल. यानंतर त्यात बारीक कापूर टाका. ते चांगले मिसळा. आता त्यात टी ट्री ऑइलचे काही थेंब टाका. याने डोक्याला मसाज करा. हे तेल ३ ते ४ तास तसंच राहू द्या. आपण ते रात्रभर देखील केसांना लावून ठेवू शकता. यानंतर सकाळी केस सौम्य शाम्पूने धुवा. हे टाळू स्वच्छ करण्याचे काम करते. त्यामुळे केस मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते.

केसांना कापूर आणि खोबरेल तेल लावण्याचे फायदे

टाळूची खाज दूर करते : उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये टाळूवर घामामुळे खाज येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी तुम्ही हे तेल वापरू शकता. हे तेल टाळूची खाज दूर करण्याचे काम करते.

कोंडयापासून सुटका करते

केसांत खाज येणे आणि कोंडा होणे ही एक सामान्य समस्या आहे. यापासून आराम मिळण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु ते केसांचे दीर्घकाळ नुकसान करतात. अशावेळी, आपण खोबरेल तेल आणि कापूर देखील वापरू शकता. हे केसांमधील कोंडा दूर करते. या तेलाने टाळूची चांगली मसाज करा. केसांमध्ये जर उवा असतील तर त्याही दूर होण्यास मदत होते.

केस गळणे थांबवते

कडक सूर्यप्रकाशामुळे केस कोरडे आणि कमकुवत होतात. त्यामुळे केसगळती सुरू होते. या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी खोबरेल तेल आणि कापूर हा रामबाण उपाय आहे.

( वरील टीप्स फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्यावा. )

इतर बातम्या-

जीवघेण्या स्पर्धा | पोलिसांच्या नाकावर टिच्चून बीडमध्ये रंगली रेड्यांची चित्तथरारक झुंज; एक रेडा जखमी

Gunratna Sadavarte: सदावर्तेंनी आतापर्यंत दीड कोटी गोळा केले, वकिलांचा कोर्टातील युक्तिवाद काय?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.