कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नवजात बालकांना धोका? गर्भवती महिलांसाठी लस किती आवश्यक? जाणून घ्या तज्ज्ञांची उत्तरे

कोरोना विषाणूच्या या कठीण काळात, गर्भवती महिलांना खूप धोका आहे, कारण अशा स्त्रियांसोबतच त्यांच्या गर्भात असलेल्या मुलांनाही या विषाणूचा धोका असतो. लसीकरण हा कोरोना विषाणूची लागण टाळण्याचा एकमात्र प्रभावी मार्ग आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नवजात बालकांना धोका? गर्भवती महिलांसाठी लस किती आवश्यक? जाणून घ्या तज्ज्ञांची उत्तरे
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 4:32 PM

मुंबई : कोरोना विषाणूचा कहर देशभरात अद्याप सुरूच आहे. देशात कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये घट होत असली, तरी या साथीच्या रोगाने होणाऱ्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. भारतात कोरोना विषाणूचे 1 लाखाहून अधिक नवीन रुग्ण दररोज नोंदवले जात आहेत आणि 3 हजाराहून अधिक लोक या विषाणूला बळी पडत आहेत (Corona third wave will affect on new born babies know the answer).

कोरोना विषाणूच्या या कठीण काळात, गर्भवती महिलांना खूप धोका आहे, कारण अशा स्त्रियांसोबतच त्यांच्या गर्भात असलेल्या मुलांनाही या विषाणूचा धोका असतो. लसीकरण हा कोरोना विषाणूची लागण टाळण्याचा एकमात्र प्रभावी मार्ग आहे. तथापि, गर्भवती महिलांना ही लस देण्याबाबत बऱ्याच शंकाकुशंका आहेत. तर, डब्ल्यूएचओ आणि भारत सरकार या दोघांनीही कोरोना विषाणू प्रतिबंधक ही लस गर्भवती महिलांसाठी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.

गर्भवती महिलांसाठी कोरोना विषाणू प्रतिबंधक लस किती महत्त्वाची?

देशाच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ शारदा जैन यांनी गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनात कोरोना विषाणूसंदर्भात असलेल्या अनेक मोठ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यापैकी एक प्रश्न असाही आहे, जो खूप वेळा विचारला जात आहे आणि तो म्हणजे, गर्भवती महिलांसाठी कोरोना लस किती महत्वाची आहे? या मोठ्या प्रश्नावर डॉ. शारदा जैन म्हणाल्या की, ‘गरोदरपणात गर्भवती महिलांसाठी कोरोनाची लस आवश्यक असते.’ त्या म्हणाल्या की, साथीच्या आजाराच्या वेळी ही लस अत्यंत प्रभावी आहे, कारण गंभीर आजार आणि मृत्यूसारख्या परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी याची खूप मदत होते. एफओजीएसआयने (FOGSI : The Federation of Obstetric and Gynaecological Societies of India) देखील गर्भवती महिलांसाठी लसीकरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे (Corona third wave will affect on new born babies know the answer).

कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत नवजात मुलांना देखील धोका असेल?

तज्ज्ञांच्या मते, भारतात कोरोना विषाणूची तिसरी लाटही येईल आणि ती लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असेल. तज्ज्ञांकडून हे समजल्यानंतर, देशातील त्या सर्व पालकांमध्ये बरेच प्रश्न उद्भवू लागले आहेत. त्यांच्या मनात एक असा प्रश्न देखील आहे की, नवजात मुलांना देखील कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून धोका निर्माण होईल का?

या महत्त्वाच्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. शारदा जैन म्हणाल्या की, नवजात मुलांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अँटीबॉडी नसतात. गर्भधारणेदरम्यान, गर्भवती महिलांना सामान्य फ्लूचे इंजेक्शन दिले जाते आणि कोरोना विषाणू हा सामान्य फ्लूचा अतिशय धोकादायक प्रकार आहे. त्यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेत बर्‍याच लहान मुलांना या विषाणूची लागण झाली आहे आणि यावरून असे दिसून येते की, या साथीच्या तिसर्‍या लाटेत नवजात बालकांनाही धोका होईल. यामुळेच आतापासूनचा अशी परिस्थिती टाळण्यासाठी सरकार तयारी सुरू करत आहेत.

(Corona third wave will affect on new born babies know the answer)

हेही वाचा :

Natural Pain Killer : वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी वापरा ‘हे’ नैसर्गिक पेनकिलर; लगेच फरक पडणार

मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय, आता हॉटेल-रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांचंही प्राधान्यक्रमानं लसीकरण

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....