चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा धोका वाढला, भारताचे काय होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
झीरो कोविड पॉलिसीचे (Zero covid policy) पालन करून देखील शेवटी पुन्हा एकदा चीनला (China) कोरोनाने गाठले आहे. चीनमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असून, काही प्रातांत कोरोना रुग्ण एवढे वाढले आहेत की, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
झीरो कोविड पॉलिसीचे (Zero covid policy) पालन करून देखील शेवटी पुन्हा एकदा चीनला (China) कोरोनाने गाठले आहे. चीनमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असून, काही प्रातांत कोरोना रुग्ण एवढे वाढले आहेत की, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. चीनच्या अनेक प्रांतात कोरोनामुळे लॉकडाऊन (Lockdown)लावण्याची वेळ आली आहे. काही प्रांतात लॉकडाऊन लावण्यात आला आहे, तर काही ठिकाणी निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. ओमिक्रॉनचा सबव्हेरिएंट असलेल्या BA.2 या कोरोना विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. सर्वात प्रथम ओमिक्रॉन हा कोरोनाचा विषाणू सर्वात प्रथम दक्षिण अफ्रिकेमध्ये आढळून आला होता. त्यानंतर तो पश्चिम यूरोप मार्गे चीन आणि भारतात पसरला. ओमिक्रॉनच्या प्रसाराबाबत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, ओमिक्रॉन आणि ओमिक्रॉनचा उपप्रकार असलेला BA.2 या दोनही विषाणूंच्या प्रादुर्भावाचा दर अतिशय उच्च आहे. मात्र त्याच्यापासून धोका कमी आहे. चीनमध्ये पहिल्यापासूनच झीरो कोविड पॉलिसीचे धोरण ठेवण्यात आले होते. लसीकरणावर जोर देण्यात आला होता. त्यामुळे चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अटोक्यात राहिला. त्याचा परिणाम म्हणजे तेथील नागरिकांच्या शरीरात कोरोनाविरोधातील प्रतिपिंडे तयार न झाल्याने चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकेवर काढल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
भारतात पुन्हा कोरोनाची लाट येणार?
चीनसोबतच यूरोप आणि हॉंगकॉंगमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतात देखील कोरोनाची तिसरी लाट येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर बोलताना कोविड टास्क फोर्सचे हेड डॉक्टर नरेंद्र कुमार यांनी म्हटले आहे की, भारतात कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता फार कमी आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे देशात जेव्हा कोरोनाची तिसरी लाट आली होती, तेव्हा अनेकांना ओमिक्रॉनचा उपप्रकार असलेल्या BA.2 याच विषाणूची लागण झाली होती. याचाच अर्थ भारतातील नागरिकांमध्ये BA.2 विरोधात लढा देणारी प्रतिपींडे ऑलरेडी तयार झाली आहेत. त्यामुळे भारतात कोरोनाची आणखी एक नवी लाट येईल असे वाटत नाही.
भारतात लसीकरण वाढले
भारतात कोरोनाची नवी लाट न येण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे भारतात लसीकरणाला वेग आला आहे. देशातील बहुता:श नागरिकांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत. तसेच सर्वाधिक धोका हा साठ वर्षांवरील वृद्धांना असतो. तर त्यांच्यासाठी आता आपण बुस्टर डोस चालू केले आहेत. त्यामुळे भारतात कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता फारच कमी असल्याचेही नरेंद्र कुमार यांनी म्हटले आहे.
➡️ India’s Active Caseload declines to 32,811 today.
➡️ Active Cases presently constitute 0.08% of Total Cases.#Unite2FightCorona #We4Vaccine pic.twitter.com/6SHcmbrJYK
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) March 16, 2022
संबंधित बातम्या
Aurangabad | नो व्हॅक्सिन, नो पेट्रोल… मिशन राज्यात गाजले, पण औरंगाबादच्या लसीकरणाला अपयश का?
महिन्याच्या ‘त्या’ वेदनांकडे दुर्लक्ष नकोच… या गंभीर आजाराचे संकेत
धक्कादायक : औरंगाबादेत रुग्णालयाच्या पायरीवरच रुग्णाचा तडफडून मृत्यू, गंगापूर तालुक्यात खळबळ