लस घेतल्यानंतरही कोरोना होतोय, मग लस घ्यावी का? लसीचा एक डोस घेतल्यावर काय होतं?

कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचं संकट उभं राहिलं आहे. महाराष्ट्रात काल 41 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर देशभरात 1 लाख 59 हजार कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

लस घेतल्यानंतरही कोरोना होतोय, मग लस घ्यावी का? लसीचा एक डोस घेतल्यावर काय होतं?
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 2:02 PM

मुंबई: महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचं संकट उभं राहिलं आहे. महाराष्ट्रात काल 41 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर देशभरात 1 लाख 59 हजार कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आता कोरोना लस घेतलेल्या व्यक्ती देखील कोरोना बाधित होत आहेत. त्यामुळं अनेकांच्या मनात कोरोना लस घेतलीचं पाहिजे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी लस घेणं आवश्यक आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

वॅक्सिन घेऊनही कोरोना होतो मग लस घ्यावी का?

कोरोना लस ही संसर्ग रोखू शकत नाही मात्र कोरोनाचा आजार झाल्यानंतर रुग्ण गंभीर होऊ नये यासाठी वॅक्सिन काम करत त्यामुळं लस घेणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.

लसीचा एक डोस घेतल्यास काय होईल

कोरोना लसीकरण प्रक्रियेदरम्यान एखाद्या व्यक्तीनं एक डोस घेतला, एखाद्यानं कोरोना लस घेतलीच नाहीतर अडचण निर्माण होऊ शकते. कोरोना लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्यास दक्षिण आफ्रिकेसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. कोरोनाचा नवा वेरियंट येऊ शकतो. त्यामुळं लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे.

दुसरा डोस आणि तिसऱ्या डोसमधील अंतर नेमकं किती?

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येणार आहे. बुस्टर डोस घेण्यासाठी दुसरा डोस झाल्यानंतर 9 महिने पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. सरकारनं 9 महिन्यांची अट निश्चित केलेली असल्यानं तो कालावधी पूर्ण होण्यापूर्वी लस मिळणार नाही.

कोरोना लस घेण्यासाठी डॉक्टरांचं पत्र आवश्यक आहे का?

कोरोना लसीचा बुस्टर डोस घेण्यासाठी सहव्याधी असणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र, कोरोना लस घेण्यासाठी डॉक्टरांच्या पत्राची गरज नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानं कोरोना लस घेण्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करता येईल.

कोरोनाचा बुस्टर डोस कोणत्या लसीचा घ्यावा?

उद्यापासून कोरोनाच्या लसीच्या बुस्टर डोसचं लसीकरण सुरु होत आहे. फ्रंटलाईन वर्कर्स आणि सहव्याधी असणाऱ्या नागरिकांना कोरोना लसीचा तिसरा डोस मिळणार आहे. भारतात सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पूतनिक लस दिली जाते. नागरिकांनी यापूर्वी ज्या लसीचे डोस घेतले असतील त्याच लसीचे डोस घेणं आवश्यक आहे.

इतर बातम्या:

तुम्ही कर्ज घेऊ इच्छित आहात? कर्ज घेण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे कर्ज तुमच्यासाठी योग्य ठरेल,आजच जाणून घ्या !!

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12.30 PM | 9 January 2022

Corona Vaccination people found corona positive after taking vaccine know about details

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.