कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे भीती वाटतेय का? या 5 गोष्टी खाऊन लगेच वाढवा रोग प्रतिकारशक्ती
चला तर मग जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे खाऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. असे कोणते पदार्थ आहेत जे खाऊन आपण कोरोना पासून स्वतःचा बचाव करू शकतो. असा नक्कीच कुठला पदार्थ नाही जो तुमच्यावर जादू करेल पण असा पदार्थ आहे जो आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो, जो रोगाशी दोन हात करण्यात आपली मदत करू शकतो.
मुंबई: कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा जगभरात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे, भारतातही कोविड-19 ची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला पुन्हा एकदा सतर्क राहण्याची गरज आहे. सर्वप्रथम मास्क घालणे सुरू करा आणि वारंवार साबणाने हात धुवा. आपल्यापैकी अनेकांनी कोरोना लसीचे सर्व डोस घेतले असतील, पण तरीही व्हायरल इन्फेक्शनचा धोका कायम आहे. अशा वेळी सर्व खबरदारी घेण्याबरोबरच आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवणेही महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे खाऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. असे कोणते पदार्थ आहेत जे खाऊन आपण कोरोना पासून स्वतःचा बचाव करू शकतो. असा नक्कीच कुठला पदार्थ नाही जो तुमच्यावर जादू करेल पण असा पदार्थ आहे जो आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो, जो रोगाशी दोन हात करण्यात आपली मदत करू शकतो.
हळद
हळद भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात खाल्ली जाते, या मसाल्यात अनेक औषधी आणि आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. जे लोक नियमितपणे हा मसाला खातात त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
हिरव्या भाज्या
ब्रोकोली खूप शक्तिशाली मानली जाते, जी रोगांशी लढण्यासाठी खूप प्रभावी आहे. यात सल्फोराफेन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
पालक
ही अत्यंत पौष्टिक हिरव्या पालेभाज्या आहे. यात अनेक प्रकारचे आवश्यक अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्याला विषाणूजन्य रोगांशी लढण्यास मदत करतात. त्याचा रस आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही.
ग्रीन टी
ग्रीन टी बऱ्याच पेयांमध्ये निरोगी मानली जाते कारण त्यात कॅफिनचे प्रमाण खूप कमी असते आणि पोषक द्रव्ये असतात. जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर दररोज 4 कप ग्रीन टीचे सेवन करा.
सूर्यफूल बियाणे
सूर्यफुलाच्या बियाण्यांपासून तेल काढून स्वयंपाकाचे तेल म्हणून वापरले जाते, तसेच आपण ते कोशिंबीर किंवा सोलून थेट खाऊ शकता. यात असणारी जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स रोग प्रतिकार क्षमता सुधारतात.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)