Special Report: महाराष्ट्रावर लॉकडॉऊनचे ढग? चांद्यापासून ते बांद्यापर्यंत 15 शहरं अ‍ॅलर्टवर; वाचा सविस्तर!

राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. (Covid-19 outbreak: Mumbai and other districts in Maharashtra cause for concern)

Special Report: महाराष्ट्रावर लॉकडॉऊनचे ढग? चांद्यापासून ते बांद्यापर्यंत 15 शहरं अ‍ॅलर्टवर; वाचा सविस्तर!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 2:58 PM

मुंबई: राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे नियम पाळण्यापासून ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंगपर्यंतच्या अनेक उपाययोजनांची अमलबजावणी करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर अनेक जिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदीचे आदेश देण्यात आले असून काही ठिकाणी हॉटेल्स, पब, रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणत्या जिल्ह्यात कोरोनाची काय परिस्थिती आहे आणि काय उपाय योजना करण्यात येत आहेत, त्या विषयीचा हा ग्राऊंड रिपोर्ट! (Covid-19 outbreak: Mumbai and other districts in Maharashtra cause for concern)

मुंबईत नोटीस सत्रं

मुंबईतील कोरोनाची वाढती संख्या पहाता पालिका अॅक्शन मोडवर आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने अंधेरी पश्चिमेतील 32 हॉटेल, पब, रेस्टॉरंट आणि मंगलकार्यालयाना नोटीसा बजावल्या आहेत. कोरोनाचे नियम पाळणं सर्वांसाठी बंधनकारक असून या नियमांचं काटेकोरपणे पालनं करा. तसेच होणारी गर्दी टाळा, अशा सूचनाच पालिकेने या हॉटेल, रेस्टॉरंट, पब आणि मंगलकार्यालयांना नोटीशी दिल्या आहेत. मुंबईत काल 823 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चेंबूर येथे कोरोनाचे रुग्ण अधिक असल्याने या ठिकाणच्या चार इमारती सील करण्यात आल्या आहेत. 14 दिवसांसाठी या इमारती सील करण्यात आल्या आहेत. या इमारतीत राहणाऱ्या लोकांना घरातूनच काम करावं लागत असून जेवणही ऑनलाईन मागवावं लागत आहे. चेंबूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या परिसरात कडक निर्बंध घालण्यात आले असून परिसरात शुकशुकाट पसरला आहे. धारावीतही कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आलं आहे. तसेच मुंबईत कोविड कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन करण्याचा सध्या विचार नसल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

मुंबईत दंड वसुली

आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या मुंबईकरांकडून 31 कोटी 79 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. काल (शुक्रवार 19 फेब्रुवारी) एका दिवसातच मुंबईभरातील 24 वॉर्ड मध्ये 13,592 जणांवर कारवाई करण्यात आली. एका दिवसात पालिकेकडून 27 लाख 18 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सर्वात जास्त कारवाई के वेस्ट- अंधेरी पश्चिम भागात करण्यात आली. या ठिकाणी एका दिवसांत 1253 जणांवर कारवाई करण्यात आली. एकट्या अंधेरी पश्चिम विभागातून अडीच लाखांचा दंड गोळा करण्यात आला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईतील के ईस्ट (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड (मुलुंड), आर सेंट्रल (बोरिवली), एम वेस्ट (चेंबूर, टिळक नगर) या भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं सांगितलं. हे चारही वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट ठरताना दिसत आहेत. मुंबईत दररोज कोरोना रुग्णांची संख्या 10 ते 15 टक्क्याने वाढत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

तर वसई-विरार महापालिका दुकाने बंद करणार

वसई विरार महापालिकेकडून पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यास सुरुवात झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांना 200 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुकाने, आस्थापना यांना कोव्हीड संबंधी दिलेले नियमांचे पालन न केल्यास 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास दुकाने, आस्थापना बंद करण्यात येणार असल्याचा इशाराही महापालिकेने दिले आहेत.

ठाण्यात रुग्णालये ताब्यात घेणार

कोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांवर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने दंडात्मक करवाई करण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, लग्न समारंभ, क्लब आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन न करणाऱ्यांवर वेळ प्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शहरातील रेड झोन, कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील हालचालीवर लक्ष ठेवण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणे, मार्केटस् घाऊक बाजारपेठा, भाजीपाला मार्केटस् या ठिकाणी अनावश्यक गर्दी होवू नये या करिता महापालिकेच्या प्रभाग समिती निहाय व्यापक जनजागृती, रिक्षांमधून नागरिकांना आवाहन करणे आदी कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याचं ठाण्याचे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सांगितलं.

कोरोना सदृष्य लक्षणे असलेल्या नारिकांची कोविड चाचणी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठा, रेल्वे स्टेशन्स, बस स्टॅाप, एसटी स्टॅन्ड आदी ठिकाणी चाचणी केंद्रे सुरू करण्यात येणार असून चाचण्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेचे विलगीकरण कक्ष, कोविड केअर सेंटर्स पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले असून आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालये कोविड केअर सेंटर्स म्हणून अधिगृहित करण्यात येतील असे सांगून याबाबत शहरातील डॅाक्टर्स, त्यांच्या संघटना यांच्याशी समन्वय सुरू आहे. त्याचबरोबर कोविड १९ चाचण्यासाठी आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोग शाळा व्यवस्थापनांशीही चर्चा सुरू असून शहरात जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात याचे नियोजन करण्यात आले आहे, असं ते म्हणाले.

कल्याण-डोंबिवलीत इमारत सील करणार

ठाणे मंडळात दिवसभरात 1 हजार 453 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मिरा भाईंदर, पालघर, वसई-विरार, रायगड, पनवेल या शहर आणि महापालिकेचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली शहरातही आता कोरोनाचे नवे रुग्ण आढळू लागले आहेत. कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र, अचानक पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. शहरातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा नियंत्रणात आणण्यासाठी केडीएमसी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्स केडीएमसीच्या अधिकृत फेसबुक पेजवर सांगण्यात आल्या आहेत.

विना मास्क तसेच मास्क आणि तोंड झाकेल असा मास्क ज्यांनी परिधान केला नाही अशा नागरिकांवर पोलीस विभागाच्या मदतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल. मॉल, भाजी मंडई, व्यापारी, दुकाने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या आणि विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. मंगल कार्यालये, बँकेट हॉल इत्यादी ठिकाणी लग्नसमारंभासाठी 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास, तसेच या कार्यक्रमात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसेल तर सदर अस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून आस्थापना सील करण्याची कारवाई करण्यात येईल. रेस्टॉरंट, हॉटेल, उपाहारगृहे, मद्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू असल्याची तपासणी करून सदर नियमांचेच पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्या आस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर सदर आस्थापना सील करण्याची कार्यवाही करण्यात येईल. दुकाने, हॉल, रेस्टॉरंट,मद्यालये इत्यादी मधील कामगार /कर्मचारी आणि फेरीवाले यांची अँटीजेन टेस्ट करण्याची व्यवस्था करणेबाबत तसेच खाजगी रुग्णालये दवाखाने इत्यादी ठिकाणी कोविड सदृश रुग्णांची अँटीजेन /swab टेस्ट करण्याबाबतच्या सूचना द्याव्यात, अशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

पुण्यात मास्क बंधनकारक

पुणे मंडळात एकूण 1165 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात पुणे, पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, सोलापूर, सोलापूर मनपा, सातारा याचा समावेश आहे. बईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाचे रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पुण्यातील वाढता कोरोना लक्षात घेता शहरात मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबतची नियमावली जाहीर केली आहे. पुण्यात आज (20 फेब्रवारी) होणारा वशाटोत्सव रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच सूचनेनुसार हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वशाटोत्सवाच्या आयोजकांनी सांगितले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.

नाशिकमध्ये लग्न सोहळ्यांवर पुन्हा निर्बंध

कोरोना रुग्णांची संख्या (Coronavirus patient) पुन्हा झपाट्याने वाढायला लागल्यामुळे नाशिक प्रशासनाकडून एक महत्त्वाची निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यात लग्नसोहळ्यांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता लग्नाला फक्त 100 लोकच उपस्थित राहू शकतील. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी हे आदेश जारी केले आहेत. तसेच आगामी काळात हे निर्बंध आणखी कठोर होऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. याशिवाय, नाशिकमधील प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये पुन्हा फलक लावण्यासही सुरुवात झाली आहे. कोरोनाचा एखादा रुग्ण आढळून आल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी केली जाणार आहे. नाशिक मंडळात आज दिवसभरात 689 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात नाशिक, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, अहमदनगर मनपा, धुळे, धुळे मनपा, जळगाव, जळगाव मनपा, नंदूरबार या शहर आणि महापालिकेचा समावेश आहे.

कोल्हापुरात सॅनिटायझर, मास्क सक्तीचे अन्यथा फौजदारी

कोल्हापुरात सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर सक्तीचा केला गेला आहे. जर नागरिकांनी नियमाचे पालन नाही केले तर संबंधितांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर सक्तीचा, अन्यथा फौजदारी कारवाई होणार आहे. लग्नसमारंभ, राजकीय मेळावे, सभा खुल्या जागेवर घेता येणार नाही. बंदिस्त सभागृहात परवानगी असेल. लग्नसमारंभ आणि मेळावे बंदिस्त जागेत तसंच 50 टक्के उपस्थितीतच (हॉलच्या 50 टक्के) करावे लागणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढला आहे. तसं अंत्यसंस्कारासाठीही 20 लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर सक्तीचा, अन्यथा फौजदारी कारवाई होणार आहे. लग्नसमारंभ, राजकीय मेळावे, सभा खुल्या जागेवर घेता येणार नाही. बंदिस्त सभागृहात परवानगी असेल. लग्नसमारंभ आणि मेळावे बंदिस्त जागेत तसंच 50 टक्के उपस्थितीतच (हॉलच्या 50 टक्के) करावे लागणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढला आहे. तसं अंत्यसंस्कारासाठीही 20 लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे. कोल्हापुरात विद्यार्थी नेता कन्हैया कुमारची सभा होणार होती. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही सभा रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर मंडळात आज दिवसभरात 71 कोरोना रुग्ण वाढले आहेत. यात कोल्हापूर, कोल्हापूर मनपा, सांगली, सांगली मनपा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या महापालिकांचा समावेश होतो.

नागपुरात कार्यक्रमांसाठी आठ दिवस परवानगी बंधनकारक

नागपुरातील कोरोनाचा रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपूर्वी आटोक्यात होती. मात्र येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाल्याचे होत असल्याचे दिसून येत आहे. 19 फेब्रुवारी रोजी तब्बल 644 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथील प्रशासनाने खबरदारी म्हणून योग्य त्या उपायोजनांची अंमलबजावणी करणे सुरु केले आहे. तसेच वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागपुरात आता कोणत्याही कार्यक्रमासाठी आठ दिवस आधीच परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून नागपुरातही कोरोना (Nagpur Corona) रुग्णांत वाढ होत आहे. जिल्ह्यातील पाटणसावंगी येथील महाविद्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथे प्राचार्यासह तब्बल 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे पुढील 10 दिवस हे महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. नागपुरात एका इमारतीत पाच रुग्ण आढळले तरी संपूर्ण इमारत सील करण्याचे आणि फ्लॅट सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच 20 रुग्ण आढळल्यास संपूर्ण रस्ता आणि परिसर सील करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्याशिवाय नागपुरात एकूण 921 रुग्णांची नोंद झाली आहे. यात नागपूर, नागपूर मनपा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर मनपा, गडचिरोली या सर्व शहरांचा समावेश आहे.

यवतमाळचे जिल्हाधिकारी रस्त्यावर, नव्याने निर्बंध लागू!

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन, नागरिक मास्क लावतात की, नाही त्याची पाहणी केली. तसेच कोरोनाचे नियम मोडल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. कोरोनाचं संकट वेळीच रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिस विभागाच्या मदतीने कडक कारवाईचे संकेत देतानाचा कोव्हिड-19 ची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर, कोविड 19 रूग्णांची गैरसोय होवू नये यासाठी रुग्णवाहिका आणि कोविड केअर सेंटर्स पूर्ववत करण्याचे नियोजन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

औरंगाबादेत शाळा पुन्हा बंद

औरंगाबादेतही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यामुळे कोरोनाचा चढता आलेख लक्षात घेता येथील प्रशासन सतर्क झाले आहे. औरंगाबाद माहनगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे (astik kumar pandey) यांनी शहरातील सर्व शाळा पुन्हा बंद करण्याचा आदेश दिला आहे. या नव्या आदेशानुसार शहरातील इयत्ता 10 आणि 12 वीचे वर्ग वगळता इतर सर्व वर्ग बंद असणार आहेत. या नव्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला. औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील प्रशानने प्रतिबंधात्मक उपायांची अंमबलबजावणी करणे सुरु केले आहे. ज्या व्यक्तीला कोरोनचा संसर्ग झालेला असेल, त्या रुग्णाचे घर औरंगाबादेत सील करण्यात येणार आहे. घर सील करून घरावर स्टिकरही लावण्यात येणार आहे. येथील प्रशासनाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही गती दिलेली आहे.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्थानिक बसस्थानक चौकात जिल्हाधिकार्‍यांनी थांबत नागरिकांना मास्क लावण्याची विनंती केली. तसेच विनामास्क फिरणार्‍यांना दंडही केला. तसंच यापुढेही रुग्ण वाढू नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स ठेवावं, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या. औरंगाबाद मंडळात एकूण 243 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात औरंगाबाद, औरंगाबाद मनपा, जालना, हिंगोली, परभणी, परभणी मनपा या महापालिकांचा समावेश आहे. औरंगाबादेत कोरोनाच्या 158 रुग्णांची वाढ झाली आहे. चार महिन्यातली ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. त्याचबरोबर चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात तब्बल 701 रुग्णांवर उपचार सुरू असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोचली 48 हजार 293 वर पोहोचली आहे.

पंढपुरात दिंड्यांना बंदी

पंढरपुर आणि परिसरातील दहा गावात संचारबंदी लागून करण्यात आली आहे. येत्या 23 फेब्रुवारी रोजी पंढरपुरात माघी यात्रा आहे. या माघी दिंड्यांना प्रवेश बंदी करण्यात आला आहे. तसेच 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी पंढरपुरातील दहा गावात संचारबंदी लागू राहिल असं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं.

अकोल्यात रात्री कर्फ्यू

अकोल्यात आता रात्रीचा कर्फ्यू जारी लागू करण्यात आला आहे. अकोल्यात कोरोनाचा वाढता कहर पाहता जिल्हाधिऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत कर्फ्यू राहणार आहे. अकोल्यात 15 फेब्रुवारीला 156, 16 फेब्रुवारी रोजी 159, 17 फेब्रुवारीला 174, 18 फेब्रुवारी रोजी 235 आणि 19 फेब्रुवारीला 242 रुग्ण आढळले होते. अकोल्यात आज सकाळी 173 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 13593 झाला आहे. आज दुपार नंतर उपचारा दरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्याच्या कोरोना बळींची संख्या 350 वर गेली आहे. तर आतापर्यंत 11421 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात 1822 रुग्ण उपचार घेत आहेत.

रत्नागिरीत मृतांच्या संख्येने डोकेदुखी वाढली

रत्नागिरीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे केवळ १९ रुग्ण आढळले आहेत. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर राज्याच्या पहिल्या पाचमध्ये असून कोरोनामुळे मृतांची संख्या ३५९ वर तर मृत्यूदर ३.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गडचिरोलीत रुग्णसंख्या वाढली

गडचिरोली जिल्ह्यात 19 फेब्रुवारी रोजी 13 रुग्ण आढळले तर 3 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9449 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9288 वर पोहचली आहे. तसेच सद्या जिल्ह्यात 56 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

जळगावमध्ये एकाच व्यक्तीला तीन वेळा कोरोना

राज्यात कोरोना आहे, पण जळगाव जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना आहे. एका व्यक्तीला तीन तीन वेळा त्याची लागण होत आहे. माजीमंत्री एकनाथ खडसे यांना गेल्या दोन महिन्यात तीनवेळा कोरोनाची लागण झाली आहे. हा कोरोनाचा कोणता प्रकार आहे, याची चौकशी करावी असे मी म्हणणार नाही पण या कोरोनावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले पाहिजे, अशी मागणी करत भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंना झालेल्या कोरोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Covid-19 outbreak: Mumbai and other districts in Maharashtra cause for concern)

मराठावाड्यात 3780 होम क्वॉरंटाईन

मराठवाड्यात 3780 नागरिकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. चार महिन्यानंतर पहिल्यांदाच मराठवाड्यातील होम क्वॉरंटाईनचा आकडा वाढला आहे. परभणीत सर्वाधिक 3206, हिंगोलीत 310 आणि नांदेडमध्ये 212 नागरिक होम क्वॉरंटाईन झाले आहेत. मराठवाड्यातील होम क्वॉरंटाईनचे प्रमाण वाढत चालल्याने प्रशासनावरील ताण वाढला आहे. (Covid-19 outbreak: Mumbai and other districts in Maharashtra cause for concern)

पाहा आकडे काय सांगतात

पालघर जिल्हा ग्रामीणमधील रुग्णसंख्या

11 फेब्रुवारी — 10 रुग्ण — 00 मृत्यू 12 फेब्रुवारी — 04 रुग्ण – 00मृत्यू 13 फेब्रुवारी — 10 रुग्ण – 00 मृत्यू 14 फेब्रुवारी – 7 रुग्ण — 00 मृत्यू 15 फेब्रुवारी – 1 रुग्ण — 01 मृत्यू 16 फेब्रुवारी — 02 रुग्ण – 00 मृत्यू 17 फेब्रुवारी – 04 रुग्ण — 00 मृत्यू 18 फेब्रुवारी- 15 रुग्ण –00 मृत्यू 19 फेब्रुवारी–12 रुग्ण -00 मृत्यू

वसई-विरार महानगरपालिकेतील रुग्णसंख्या

11 फेब्रुवारी — 19 रुग्ण — 00 मृत्यू 12 फेब्रुवारी — 17 रुग्ण – 00मृत्यू 13 फेब्रुवारी — 24 रुग्ण – 00 मृत्यू 14 फेब्रुवारी – 20 रुग्ण — 00 मृत्यू 15 फेब्रुवारी – 19 रुग्ण — 00 मृत्यू 16 फेब्रुवारी — 13 रुग्ण – 00 मृत्यू 17 फेब्रुवारी – 6 रुग्ण — 00 मृत्यू 18 फेब्रुवारी- 29 रुग्ण — 00 मृत्यू 19 फेब्रुवारी–31 रुग्ण – 00 मृत्यू

यवतमाळमधील रुग्णसंख्या

14 फेब्रुवारी – 115 पॉझिटिव्ह 15 फेब्रुवारी- 34 पॉझिटिव्ह 16 फेब्रुवारी – 81 पॉझिटिव्ह 17 फेब्रुवारी – 109 पॉझिटिव्ह 18 फेब्रुवारी – 237 पॉझिटिव्ह, 1 मृत्यू 19 फेब्रुवारी – 126 पॉझिटिव्ह, 2 मृत्यू

अकोल्यातील रुग्णसंख्या

15 फेब्रुवारी – 154 – पॉझिटिव्ह 16 फेब्रुवारी – 159 -पॉझिटिव्ह 17 फेब्रुवारी – 174 – पॉझिटिव्ह, 2 मृत्यू 18 फेब्रुवारी – 235 – पॉझिटिव्ह 19 फेब्रुवारी – 242 – पॉझिटिव्ह, 2 मृत्यू (Covid-19 outbreak: Mumbai and other districts in Maharashtra cause for concern)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी ! राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, विजय वडेट्टीवार यांचे संकेत

विनामास्क मुंबईकर बीएमसीच्या रडारवर, एका दिवसात 27 लाखांची दंडवसुली

औरंगाबादेत शाळा पुन्हा बंद, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता निर्णय

(Covid-19 outbreak: Mumbai and other districts in Maharashtra cause for concern)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.